Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthसावधान! दूध किंवा ज्यूससोबत औषधं घेणं आरोग्यासाठी घातक

सावधान! दूध किंवा ज्यूससोबत औषधं घेणं आरोग्यासाठी घातक

Subscribe

सध्याच्या काळात अनेकांना मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या आजारांमध्ये नियमित काही औषधांचे देखील सेवन करावे लागते. त्यामुळे अनेकजण औषधं ज्यूस किंवा दुधासोबत घेतात. परंतु दूध किंवा ज्यूससोबत औषध घेणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ज्यूस किंवा दुधासोबत औषधे घेतल्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.

दूध किंवा ज्यूससोबत औषधं का घेऊ नये?

8 Dangerous Food-Drug Interactions You Should Know - Meds Safety

- Advertisement -
  • हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, औषधांमध्ये असलेले रसायन हे दूध किंवा ज्यूसमध्ये एकत्र होतात आणि त्यांची उलट प्रक्रिया सुरू होते. ज्यामुळे आपल्या शरिराला त्रास होण्याची शक्यता असते.
  • अनेक लोक औषध घेताना ज्यूस घेतात. या फळांच्या ज्यूसमध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन असते ज्याने औषधाचा प्रभाव कमी होतो. ज्यूससोबत औषधे घेतल्याने औषधांचे स्वरुप बदलते.
  • जर तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे औषध ज्यूससोबत घेत असाल तर त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.

Medications To Not Take With Dairy

  • तसेच जर तुम्ही कोणतीही एंटीबायोटीक औषधे दुधासोबत घेत असाल तर दुधात असलेले कॅल्शिअम, मॅग्नीशयसारख्या घटकांचा प्रभाव कमी होतो.
  • अनेकांना रात्री झोपताना किंवा जेवल्यानंतर चॉकलेट खाण्याची सवय असते. तुम्ही झोपेचे औषध घेत असाल तर त्यानंतर डार्क चॉकलेट खाणे टाळा.
  • तसेच डिप्रेशनची औषधे घेतल्यानंतर तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू नका यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.

 

- Advertisement -

हेही वाचा :

- Advertisment -

Manini