घरराजकारणआव्हाडांनी कौतुक केलेल्या 'त्या' तरुणाला अटक, ट्वीट करत व्यक्त केला संताप; काय...

आव्हाडांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ तरुणाला अटक, ट्वीट करत व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण?

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तांतरादरम्यान घडलेल्या विविध घटनांचा उल्लेख करत राम मुंगासे या तरुणाने '50 खोके एकदम ओके' असं म्हणत एक रॅप तयार केलं होतं. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतरादरम्यान घडलेल्या विविध घटनांचा उल्लेख करत राम मुंगासे या तरुणाने ’50 खोके एकदम ओके’ असं म्हणत एक रॅप तयार केलं होतं. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात घडलेल्या सत्तांतरावर काही दिवसांपूर्वी एका तरुणाने रॅप तयार करत ते सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. परंतु त्याचा हा र‌ॅप व्हिडीओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आणि हा चर्चेचा विषय ठरला. यावेळी आव्हाडांनी राम मुंगासे या तरुणाला अटक करु नका, असे म्हटले होते. परंतु आता या तरुणाला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक करत त्याला अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे. Ram Mungase made rap on Maharashtra Politics now he arrested by sambhajinagar police NCP leader Jitendra Awhad tweeted

- Advertisement -

आव्हाडांचे ट्वीट काय?

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं,असे म्हणत आव्हाडांनी सरकारवर आरोप केला आहे.

आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही, असे म्हणत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. बंडखोर आमदार सर्वप्रथम गुजरातमधील, सुरत त्यानंतर आसामधील गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करत महाराष्ट्रात आले.

( हेही वाचा: महापालिका निवडणुकांबाबत चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले… )

40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार, नगरसेवक, पदाधिकारी हेही शिंदे गटात सामील झाले.यावेळी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, असा डायलाॅगही सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच संपूर्ण प्रकरावर राम मुंगासे या तरुणाने एक र‌ॅप बनवले आहे. या र‌ॅपमध्ये त्याने काही आक्षेपार्ह शब्दही वापरले आहेत. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -