Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthजास्त लोणचं खाण्याची सवय पडू शकते महाग

जास्त लोणचं खाण्याची सवय पडू शकते महाग

Subscribe

लोणचं हा शब्द ऐकताच तोंडाला पाणी सुटू लागते. तसेच लोणची ही अनेक प्रकारची असतात. अशातच लोणचे जास्त खाण्याची सवय देखील तुम्हाला आजारी बनवू शकते. लोणच्याचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात मीठ आणि तेल टाकले जाते. यामुळे उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि हाडे ढिसूळ होऊ शकतात.

अनेकदा आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणच्याचा तुकडा ताटात घालतो. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. लोणचे खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होतो. पण तुम्हाला माहित आहे का की लोणचे जास्त खाण्याची सवय तुम्हाला आजारी देखील बनवू शकते. तर आता आपण जास्त लोणचे खाल्याने कोणते दुष्परिणाम होतात हे जाणून घेऊया..

- Advertisement -

15 Different Types Of Pickles And What Makes Them Unique

शरीरातील पोषक द्रव्ये कमी होतात

  • लोणचे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्रक्रियेमुळे त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते.
  • तसेच हे लोणचे बनवण्यासाठी फळे किंवा भाज्या कापून उन्हात वाळवण्यासाठी ठेवल्या जातात.
  • फळे किंवा भाज्यांमध्ये पाणी राहू दिले जात नाही. तसेच सूर्यप्रकाशात फळे कोरडी केल्यामुळे बहुतेक पोषक तत्वांचा नाश होतो.
  • लोणची वाळवण्यासाठी त्याच्या प्रक्रियेत त्यांच्यावर मीठाचा लेप लावला जातो.

लोणच्यात असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढतो

  • लोणचे किंवा लोणच्यासारख्या इतर अनेक खारट पदार्थांमध्ये असलेले सोडियम यामुळे रक्तदाब वाढतो.
  • तसेच कमी प्रमाणात लोणचे खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकत नाही.
  • पण अतिरिक्त सोडियम क्लोराईड खाण्याच्या नियमित सवयीमुळे उच्च रक्तदाब आणि इतर अनेक आजार देखील होऊ शकतात.

हेही वाचा : किडनीला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स

- Advertisment -

Manini