पोटभर खाद्यपदार्थ खाण्याचे एकमेव ठिकाण – बार्बिक्यू नेशन

पोटभर खाद्यपदार्थ खाण्याचे एकमेव ठिकाण – बार्बिक्यू नेशन

पदार्थ तळून आणि उकडून खाणं सोप असतं.परंतु,भाजून खाताना तेवढंच कौशल्य पणाला लागतं.बार्बिक्यू हा त्यापैकीच एक खाद्यप्रकार.

पदार्थ खाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्याचे निरनिराळे प्रकार असतात.कोण उकडून खातं,कोण तळून खातं तर कोण भाजून त्यात तळून आणि उकडून खाणं सोप असतं.परंतु,भाजून खाताना तेवढंच कौशल्य पणाला लागतं.बार्बिक्यू हा त्यापैकीच एक खाद्यप्रकार.बार्बिक्यू ही पाककृती पाश्चिमात्य देशांतून आपल्याकडे आलेली.त्यातही अमेरिकेमध्ये हा पदार्थ जरा जास्तच लोकप्रिय .भारतात पूर्वीपासूनच कदाचित भाजून असे पदार्थ खात असतील.

पण बार्बिक्यू या शब्दाने जरा जास्तच भारतात प्रसिद्धी मिळवली.मित्र-मैत्रीणींसोबत मुंबईच्या बाहेर रानावनात सहलीला गेल्यावर हल्ली रात्रीचा बार्बिक्यूचा कार्यक्रम हा असतोच.बार्बिक्यूच्या चवीसोबतच जो सहवास असतो,जे वातावरण असते,त्याची तुलना कधीकधी कशाशी होऊ शकत नाही.परंतु,आपल्या रोजच्या धकाधकीच्या दैनंदिन व्यग्र वेळापत्रकातून कधी कधी आपल्याला हा आनंद अनुभवता येत नाही.तो आनंद कसा अनुभवायचा हा प्रश्न होता.मुंबईत असा अनुभव कुठे मिळू शकेल याचा शोध सुरू होता आणि बार्बिक्यू नेशन नावाचे रेस्टॉरन्ट गवसले असे मी म्हणेन.बार्बिक्यू ही संकल्पना घेऊन आणि त्यासहीत इतर पदार्थ समाविष्ट करून हा उत्तम अनुभव देणारा खाद्यशोध असेल बहुदा.

मुंबईत जवळपास 14 ठिकाणी या रेस्टॉरन्टच्या शाखा असून अनलिमिटेड फुड,उत्तम सेवा,अनलिमिटेड स्टार्टर्स, अनलिमिटेड मेन कोर्स,अनलिमेटेड डेझर्ट आईसक्रीम आणि अनलिमिटेड असूनही पदार्थाचा दर्जा कायम टिकून ठेवलेला आहे. बार्बिक्यू सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे रेस्टॉरन्ट सेवा द्यायला सज्ज होते. नवीन संकल्पना, ग्राहकांना उत्तम सेवा,त्यांना आवश्यक ते वातावरण निर्माण करणे ही या रेस्टॉरन्टची वैशिष्ठ्ये आहेत. वाढदिवसाची पार्टी असेल किंवा इतर कोणताही शुभ प्रसंग असेल,मुंबईच्या बाहेर जाणे शक्य झाले नाही तर ती कसर बार्बिक्यू नेशनमध्ये जाऊन तुम्ही भरून काढू शकता.

First Published on: December 3, 2018 5:51 AM
Exit mobile version