फॅशनमध्येही तिरंग्याची क्रेझ

फॅशनमध्येही तिरंग्याची क्रेझ

trio color

अवघ्या काही दिवसांवर २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आला आहे. सर्व सणांनुसार हादेखील सण भारतात आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. दिवाळी-दसर्‍यासारखेच प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपल्या फॅशनकडे तरुणाई विशेष लक्ष देते. या दिवशी सर्व काही तिरंग्याच्या रंगात परिधान केलेले असते. तिरंग्यातील तीन मूळ रंग म्हणजे नारंगी, पांढरा आणि हिरवा हे तसे रनिंग कलर मानले जातात. ते बाजारात सहज उपलब्ध होतात. शिवाय हे तीनही रंग कोणत्याही कॉम्प्लेक्शनच्या व्यक्तींना शोभून दिसतात. मुलींमध्ये प्रामुख्याने सफेद ड्रेस आणि त्यावर रेडिमेड तिरंगी दुपट्टा ही फॅशन दिसून येते. तर काही पांढरा टॉप, नारंगी ओढणी आणि हिरवा पायजमा असेही कॉम्बिनेशन परिधान करतात. बाजारात तिरंग्यातील साडी, ड्रेस, टॉप्स सहज उपलब्ध असतात.

हे रंग केवळ आपल्या कपड्यांमध्येच नाही तर अ‍ॅक्सेसरीजमध्येही वापरता येतात. तीन रंगांच्या बांगड्या, नेलपॉलिश, कानातले, गळ्यातील माळ यांचा वापर आपण करू शकता. तर लहान मुलांसाठीही शर्ट, मुलींना स्कर्ट, टोपी तिरंग्यामध्ये शोभून दिसतात. फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांमध्येही तिरंग्याच्या फॅशनची क्रे्रझ पाहायला मिळते. तेव्हा तुम्हीही यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला तिरंग्यातील रंग वापरून आपली वेगळी फॅशन बनवा.

First Published on: January 19, 2019 5:47 AM
Exit mobile version