सावधान! व्हिटॅमिन्सच्या कमतरतेची ‘ही’ असू शकतात लक्षणं

सावधान! व्हिटॅमिन्सच्या कमतरतेची ‘ही’ असू शकतात लक्षणं

शरीराला पोषण आणि आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, ज्यामध्ये जीवनसत्त्वांचे महत्त्व देखील खूप जास्त आहे. यामुळे शरीराच्या अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास शरीरात नेहमी कमकुवतपणा जाणवतो.

व्हिटॅमिन्सच्या कमतरतेची ही आहेत लक्षणे

सतत तोंड आल्यास जेवताना खूप त्रास होतो. हे सहसा व्हिटॅमिन B 12 आणि लोहाच्या कमतरतेमुळे होते. यासाठी तुम्ही फॅटी फिश आणि फोर्टिफाइड तृणधान्ये खाऊ शकता.

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे ही समस्या आजकाल सामान्य झाली आहे. सामान्यतः हे व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे होते, नंतर रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. यासाठी संत्री, गोड लिंबू आणि लिंबू यांचे सेवन करावे.

काही लोकांना रात्री कमी दिसते, या आजाराला रातांधळेपणा म्हणतात. जे लोक त्यांच्या आहारात व्हिटॅमिन A चा पुरेसा वापर करत नाहीत त्यांना हा त्रास उद्भवू शकतो. यासाठी आहार पालक, पपईचा समावेश करावा.

 


हेही वाचा :

नाभित ‘हे’ 5 तेल घातल्यास होतील अगणित फायदे

First Published on: March 26, 2023 8:46 PM
Exit mobile version