Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthलिव्हरसाठी दारू पेक्षाही धोकादायक आहेत हे पदार्थ

लिव्हरसाठी दारू पेक्षाही धोकादायक आहेत हे पदार्थ

Subscribe

फॅटी लिव्हर हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे लिव्हरचे कायमचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच फॅट देणाऱ्या या पदार्थांपासून दूर राहा.

(Fatty Liver)अन्नाचे पचन करण्यापासून ते रक्त स्वच्छ करण्यापर्यंत अनेक कामे Liver अर्थात यकृत करते. शरीरातील या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाचे वजन सुमारे 1500 ग्रॅम असते. तुम्हालाही माहित असेल की अल्कोहोल हा या अवयवाचा सर्वात मोठा शत्रू आहे, ज्यामुळे Fatty Liver, Liver Cirrhosis यासारखे धोकादायक आजार होऊ शकतात. पण केवळ अल्कोहोलच लिव्हरला नुकसानदायक आहे का? तर नाही, अल्कोहोल शिवाय अजून काही पदार्थ लिव्हरलाही नुकसान पोहोचवू शकतात. अशा पदार्थांमुळे होणाऱ्या आजारांना Non Alcoholic Fatty Liver Disease म्हणतात. म्हणजेच, जे लोक कमी दारू पितात पण लिव्हरला नुकसानदायक पदार्थ जास्त खातात त्यांच्या लिव्हरमधील पेशींमध्ये चरबी वाढते. हा आजार जगभरात झपाट्याने वाढत आहे आणि तरुणपणात लिव्हरचे नुकसान होण्याचे प्रमाण जास्त आहे.

- Advertisement -

हाय ट्रायग्लिसराइड

बेटर हेल्थ चॅनलचा यासंदर्भात एक अहवाल आहे की, हाय ट्रायग्लिसराइड फुड्स हे नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हरचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच ते नियंत्रणात खावे. नारळ, बटाटे, तांदूळ, मध, लोणी इत्यादींमध्ये फॅट भरपूर असते.

- Advertisement -

हाय ग्लायसेमिक इंडेक्स

हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने प्री-डायबिटीज आणि मधुमेहाचा धोका वाढतो. जे फॅटी लिव्हर रोगाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे गुलाब जामुन, गोड मिठाई, पांढरे ब्रेड, बटाटे, पांढरा भात, शीतपेये इत्यादी काळजीपूर्वक आणि मर्यादित प्रमाणातच खा.

लठ्ठपणा वाढवणाऱ्या गोष्टी

वाढत्या लठ्ठपणातही, लिव्हरवर फॅट जमा होऊ शकते. म्हणूनच तुम्ही जास्त अन्न खाऊ नका, तसेच गोड, प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड, फॅट फूड, तेल इत्यादी खाऊ नये. हे पदार्थ लिव्हर खराब करू शकतात.

त्रिफळा चूर्ण आहे उपयोगी

त्रिफळा चूर्ण हे यकृत अर्थात लिव्हर शुद्ध करणारे मानले जाते. त्यामुळे फॅट कमी होते आणि लिव्हरची कार्यक्षमता वाढते. आवळा, हरड आणि बहेडा पावडर एकत्र करून त्रिफळा पावडर बनवली जाते. याचे सेवन केल्याने लिव्हर डिटॉक्स होते.

लिव्हरसाठी बदाम

बदाम हे व्हिटॅमिन ई चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. एनसीबीआय अभ्यास दर्शविते की व्हिटॅमिन ई ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढा देते आणि यकृत निरोगी ठेवते.

- Advertisment -

Manini