Sunday, May 19, 2024
घरमानिनीHealth'या' पदार्थांमुळे वाढेल तुमची स्मरणशक्ती

‘या’ पदार्थांमुळे वाढेल तुमची स्मरणशक्ती

Subscribe

अनेकांना प्रत्येक गोष्ट लवकर विसरण्याची सवय असते. स्मरणशक्ती कमकुवत असल्यास नोकरी, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रात अपयश मिळतं. स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करु शकता.

स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी काय करावे?

5 Essential Nutrients for Brain Health and Memory | Sagewood

- Advertisement -
  • फळे आणि भाज्या

गडद किंवा वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्सचे सेवन केल्यास मेंदूच्या ऊतींचे संरक्षण होते. तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले फोलेट, ‘क’ आणि ‘ई’ जीवनसत्त्व हे सुद्धा चांगले अँटीऑक्सिडंट्स आहेत. यामुळे मेंदूतील पेशींची दुखापत आणि ऑक्सिकरण यापासून बचाव होतो. तज्ज्ञांच्या मते, आहारात पालक, पत्ताकोबी, टरबूज आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांचा समावेश करावा.

  • ‘ओमेगा-3’ फॅटी अ‍ॅसिड

सॉलमन माशांमध्ये सर्वांत जास्त ‘ओमेगा-3’ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आढळून येते. याउलट शाकाहारी लोक काशीफळाच्या बिया, सोयाबीन, अक्रोड आणि जवस यांचा जेवणामध्ये भरपूर समावेश करू शकतात. यामुळे मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करतो. वास्तविक ‘ओमेगा-3’ फॅटी अ‍ॅसिड इंधनाइतके काम करतो. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश असावा.

- Advertisement -
  • प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळा

जंक फूड, प्रोसेस्ड फूड दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी विविध रसायनांचा आणि कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. ही रसायने मानवी आरोग्यासाठी घातक असतात. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे खाद्यपदार्थ न्युरोट्रान्समीटर किंवा ब्रेन केमिकल्समध्ये अडथळे आणण्यास कारणीभूत ठरतात.

14 Brain-Healthy Foods for Memory and Cognition - MIND Diet Foods

  • सुका मेवा

झिंक, मॅग्नेशियम आणि लोह यासारखी खनिज द्रव्ये सुक्या मेव्यातून प्राप्त केली जाऊ शकतात. यामुळे मेंदू वेगाने काम करतो. विशेषत: अक्रोड आणि बदामाचे सेवन केल्याने मेंदू अधिक कार्यक्षम होतो.

  • व्यायाम

मानवी मेंदूत नवीन पेशींचा विकास होत राहतो. वय वाढत असताना मेंदूची कार्यक्षमता मंद होऊ लागते. अशावेळी नियमित व्यायाम केल्याने मेंदूच्या पेशींचा विकास होण्यास मदत मिळते. सकाळी जॉगिंग केल्याने मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि मेंदूत अ‍ॅण्डोर्फीन नावाच्या हॅप्पी हार्मोनची सक्रियता वाढते. यामुळे तणाव कमी होण्यासोबतच चयापचयाची गती वाढते.


हेही वाचा :

सकाळी उठल्यानंतर कधीही करु नका ‘या’ 5 चुका

- Advertisment -

Manini