Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthस्मरणशक्ती कमी होण्याची कारणे

स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे

Subscribe

वाढत्या वयाबरोबर प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि मन दोन्ही कमकुवत होऊ लागतात. अनेकांना तर स्मृतिभ्रंश होतो. पण हे झाले वाढत्या वयाच कारण. पण, हल्ली तरुणाईमध्येही विसरण्याची समस्या पाहायला मिळते. लहान वयातच लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागली आहे. लोक रोजच्या जीवनातील गोष्टी विसरू लागलेत. अशाने लोकांना रोजच्या जीवनातील कामे करताना अडचणी जाणवत आहेत. स्मरणशक्ती कमी होण्याला जसे वाढते वय जबाबदार आहे तसेच यामागे अनेक कारणेही आहेत.

या कारणामुळे देखील स्मरणशक्ती कमी होते – 

- Advertisement -

डॉक्टरांच्या मते, जर तुमच्याकडे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. व्हिटॅमिन बी 12 केवळ एनएव्हीलाच हानी पोहचवत नाही तर स्मरणशक्ती कमी होण्याचे कारण देखील आहे. व्हिटॅमिन बी 12 ची लेवल कमी झाल्यामुळे आठवणी धूसर होऊ लागतात. विसराळूपणा वाढू लागतो. विचार करण्यास अडचणी येतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या समस्येतून जात असाल तर एकदा व्हिटॅमिन बी 12 ची लेवल चेक करून घ्या.

आजकाल प्रत्येक दुसरी व्यक्ती हायपोथायरॉइडिझम समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होत चालली आहे. हायपोथायरॉइडिझमने ग्रस्त लोकांना बऱ्याचदा गोष्टी लक्षात ठेवण्यास आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास अडचणी जाणवतात.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यात एकाग्रतेचा अभाव असेल तर तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण अनेक गोष्टी एकत्र करतो. त्यामुळे मल्टी टास्कच्या नादात आपण एका कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यामुळे गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते.

याशिवाय क्रॉनिक डिप्रेशनमुळे तुम्हाला गोष्टी विसरायला लागता. ज्या लोकांना डिप्रेशनची समस्या असते, त्यांची स्मरणशक्ती कमी होऊ लागते. अशावेळी डिप्रेशनची लक्षणे ओळखणे आणि तज्ञांशी बोलणे उत्तम ठरेल.

स्त्रियांमध्ये मेनोपॉजमुळे विसरण्याची समस्या सुरु होते. मेनोपॉजदरम्यान, शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे मूड बदलणे, निद्रानाश सारख्या समस्या दिसून येतात.

जर तुम्हाला रोज 7 ते 8 तासांची झोप मिळत नसेल तर त्याचा तुमच्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अपूर्ण झोपेमुळे मेंदू फ्रेश होत नाही तर पूर्ण झोपेमुळे तुमचा मेंदू फ्रेश फील करतो आणि तुम्ही अधिक सतर्क होता.

तुमचा अपघात झाला असेल आणि डोक्याला दुखापत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डोक्याची दुखापत स्मरणशक्ती कमी होण्याचे कारण बनू शकते. काहीवेळा तुम्हाला वरून हलकी वाटणारी दुखापत ही आंतरिकदृष्ट्या अधिक गंभीर असू शकते.

 

 

 


हेही पहा : या कारणांमुळे महिला लीडरशिपमध्ये मागे 

 

- Advertisment -

Manini