गरोदर महिलांनी असा करावा ‘कोरोना’व्हायरसपासून बचाव

गरोदर महिलांनी असा करावा ‘कोरोना’व्हायरसपासून बचाव

जन्माला येण्यापूर्वी बाळाची सोशल मीडियावर विक्री!

गरोदर महिलांच्या प्रतिकारक्षमतेमध्ये आणि शरीरात बदल होत असल्यामुळे विषाणूचा, विशेषता COVID 19 चा श्वसनयंत्रणेत प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या परिस्थितीत महिलांनी काय काळजी घ्यावी याबद्दल सांगणार आहोत.

करोना विषाणूची लक्षणे

ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये त्या व्यक्तीला न्यूमोनिया, सार्स, मूत्रपिंड निकामी होणे, असे गंभीर परिणाम दिसू लागतात किंवा मृत्यूसुद्धा होतो. त्यामुळे तातडीने वैद्यकीय मदत घेणे हितावह असते.

कोरोनाव्हायरसची लागण कोणाला होऊ शकते?

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला या आजाराची लागण होऊ शकते. गरोदर महिलांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही गरोदर असाल तर घाबरून जाऊ नका. उलट स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करा.

गरोदर महिलांनी काय लक्षात ठेवावे?

जी महिला गरोदर आहे त्या महिलेला फ्ल्यूसारखे विषाणूजन्य श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असते आणि त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण गरोदर महिलांची प्रतिकारक्षमता कमी असते आणि त्यामुळेच त्यांना विषाणूजन्य आजारांची लागण होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे इतरांच्या तुलनेने गरोदर महिलांनी गंभीर स्वरुपाचा आजार, व्यंग किंवा मृत्यूचीही शक्यता अधिक असते. त्यांना कोरोनाव्हायरसशी संबंधित इतर आजार होण्याचीही शक्यता असते. यात सार्स आणि एमईआरएस-सीओव्ही आणि गरोदरपणात होणाऱ्या इन्फ्ल्यूएंझासारखे इतर विषाणूजन्य श्वसनाचे आजार समाविष्ट आहेत.

First Published on: March 23, 2020 6:00 AM
Exit mobile version