पालकांनो तुमच्या मुलांना मादक पदार्थांचे व्यसन लागले आहे का? कसे ओळखाल?

पालकांनो तुमच्या मुलांना मादक पदार्थांचे व्यसन लागले आहे का? कसे ओळखाल?

सध्या सुरू असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे तरुण पिढी मादक किंवा अमली पदार्थांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे. बऱ्याच वेळा दोन्ही पालक नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर असल्यानं मुले काय करतात याबद्दल त्यांना माहित नसते. जेव्हा मुलगा व्यसनाच्या पूर्ण आहारी जातो त्यावेळी मात्र मुलाचे काहीतरी बिनसत असल्याचे त्यांच्या लक्षात येते. यात मुलाला व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यात पालकांना यश मिळते तर काही वेळा बराच उशीर झालेला असतो. याचविषयी फोर्टीस रुग्णालयाचे मानसोपचार तज्ञ डॉ. केदार तिळवे यांनी खास पालकांसाठी लिहिलेला हा लेख.

पालकांचे त्‍यांच्‍या मुलांच्‍या जीवनाला आकार देण्‍यामध्‍ये मोठे योगदान असते. पण, योग्‍य मार्गदर्शन मिळाले नाही तर मुलांवर त्‍यांचे सहकारी मित्र व आसपासच्‍या वातावरणाचा प्रचंड प्रभाव पडू शकतो आणि ते जीवनाच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये मादक पदार्थांचे व्‍यसन यासारखे चुकीचे निर्णय घेऊ शकतात, जे खूपच घातक आहे. अनेकजण उत्‍सुकता, सहका-यांचा दबाव आणि मनोरंजनाच्‍या उद्देशाने मादक पदार्थांचे सेवन सुरू करतात. तसेच दादागिरी, दुर्लक्ष, अस्‍वस्‍थ कौटुंबिक वातावारण, वास्‍तविकतेपासून दूर राहण्‍याची गरज अशा काही बाह्य घटकांमुळे देखील मादक पदार्थांचे व्‍यसन लागू शकते. कारण काही असो, मादक पदार्थांचे सेवन वेळेवर नियंत्रित केले नाही किंवा थांबवले नाही तर शारीरिक व मानसिक आरोग्‍यासाठी अत्‍यंत घातक ठरू शकते.

तुमच्‍या मुलांना मादक पदार्थांचे व्‍यसन लागले आहे याबाबत सांगू शकणारी अशी कोणतीही वैश्विक लक्षणे नाहीत.
पण, मुलांमध्‍ये दिसून येतील अशी काही विशिष्‍ट शारीरिक लक्षणे आहेत.

मादक पदार्थांच्‍या व्‍यसनापासून दूर ठेवण्‍यासाठी पालक त्‍यांच्‍या मुलांना कशाप्रकारे मदत करू शकतात? तुम्‍ही स्थिती काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. तुम्‍हाला तुमच्‍या मुलाला मादक पदार्थांचे व्यसन लागले असल्‍याचे समजल्‍यानंतर प्रतिसाद द्या आणि प्रतिक्रिया देऊ नका. प्रखर व रागीट प्रतिक्रियेमुळे स्थिती सुरळीत होण्‍यापेक्षा अधिक बिकट होईल. ही वेळ संयमी राहण्‍याची असते.

First Published on: October 28, 2021 4:07 PM
Exit mobile version