हवेतील प्रदूषण आणि हॉर्नच्या गोंगाटामुळे हार्ट अटॅकचा धोका

सौजन्य-गुगल

हवेतील प्रदूषणाचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो हे आपल्याला महितच आहे. पण जर तुम्ही दिर्घकाळ वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण असलेल्या परिसरात राहत असाल तर तुम्हांला हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका आहे. त्यातही जर तुम्हांला हाय ब्लड प्रेशर आहे आणि तुम्ही धूम्रपान करत असाल तर हा धोका अनेक पटीने वाढू शकतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे. ‘जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन’ मध्ये यावर अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

डेन्मार्क युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगनमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रोफेसर आणि या संशोधनाचे लेखक यू ही लिमो यांनीदेखील यासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. हृदयाशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष न करण्याचे सल्ला त्यांनी दिला आहे. वायु आणि ध्वनी प्रदुषण आणि हृदयरोग यावर डेन्मार्क युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगनमधील संशोधकांनी १५ ते २० वर्ष काही नर्सेसवर यासंबंधीचे संशोधन केले. त्यानंतर काढण्यात आलेल्या निष्कर्षात हृदयाचा संबंध वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वायू प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी नायट्रोजन
डायऑक्साईडचे वार्षिक पातळीचे हवेतील प्रमाण तपासले गेले. यात हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये वाढ झाल्याने शरीरावर विपरित परिणाम होऊन हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याचे समोर आले .