भिंत म्हणजे कॅनव्हास

भिंत म्हणजे कॅनव्हास

गृहसजावटीमध्ये भिंतींचे सौंदर्य सर्वाधिक महत्त्वाचं असतं. याचं कारण घरामध्ये प्रवेश करणार्‍या व्यक्तीचं लक्ष सर्वप्रथम भिंतीकडे जातं. त्यामुळेच फ्लोअरिंग, छत आणि इतर सजावटीचा विचार करताना भिंतींच्या सजावटीकडे दुर्लक्ष होता कामा नये. भिंतींना सुंदर बनविण्यासाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भिंतींकडे एका रिकाम्या कॅनव्हासप्रमाणे पाहावे. असा कॅनव्हास ज्यावर आपण मनातील चित्रं काढू शकतो आणि ती सर्वांसमोर ठेवू शकतो. सध्याच्या काळात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वापरून तुम्ही आपल्या कलात्मकतेने घराच्या भिंतींचे सौंदर्य खुलवू शकता. आज भिंती या प्लास्टर, स्टँड, पेंटेड आणि पेपर रुम वापरून तयार केल्या जातात.

भिंतींना पेंट करताना

भिंतींना पेंट करताना हे पाहावे लागेल की, ती कशाची बनलेली आहे. जर भिंतींना काही चिरा पडल्या असतील किंवा ओरखडे पडले असतील तर तुम्ही त्याला योग्य प्रकारे फिनिशिंग करू शकता. त्यासाठी तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा वॉलपुट्टीचा वापरही करू शकता. जर भिंतीची अवस्था खूपच खराब झाली असेल तर प्रोफेशनल मिस्त्रीकडून त्याची योग्य प्रकारे डागडुजी करणे आवश्यक आहे. याखेरीज भिंती या जिप्सम बोर्ड किंवा ड्राय वॉलच्या पातळ कव्हरनेही तुम्ही झाकू शकता.

फिनिशिंग

भिंतींना सुंदर फिनिशिंग देण्यासाठी त्यांना रंग देणे ही एक चांगली आणि स्वस्त पद्धत आहे. पेंट किंवा रंग हे मुळातच एक अपारदर्शी माध्यम आहे. भिंतींना झाकणे हाच याचा उद्देश असतो. सध्या शेकडो रंग उपलब्ध आहेत. त्यापैकीच एखादा वेगळा रंग तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींसाठी निवडू शकता. इतकंच काय पण फॉक्स फिनिश टेक्निकने तुम्ही एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेडस् आपल्या आवडीनुसार वापरू शकता.

रंगांची निवड

फिकट आणि डोळ्यांना थंडावा देणार्‍या रंगामुळे रुम मोठ्या वाटतात. अशा प्रकारचे रंग हे छोट्या रुमसाठी किंवा ज्या भिंतीमुळे घराचे अनेक भाग झाले आहेत अशा भिंतींना जर सौम्य रंग दिले तर ते खुलून दिसतात. गडद किंवा चटपटीत रंग हे मोठ्या आकाराच्या रुमसाठी चांगला पर्याय आहे. तसेच ज्या भिंतींना फिनिशिंगची गरज आहे, तेथेही तुम्ही गडद रंग वापरू शकता. जर एखाद्या मोठ्या रिकाम्या रुममध्ये प्रकाश कमी येत असेल तर तेथे सौम्य चमकणारा रंगही तुम्ही वापरू शकता.

First Published on: October 24, 2018 2:34 AM
Exit mobile version