स्टॅमिना कसा वाढवाल?

स्टॅमिना कसा वाढवाल?

स्टॅमिना कसा वाढवाल?

बऱ्याचदा काही लोकांना थोडे जरी चाले किंवा काम केले तरी लगेच थकवा येतो. यामागे अनेक कारण असू शकतात. पण असे दररोज होत असल्यास तुमचा स्टॅमिना कमी असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुमचा स्टॅमिना कमी झाला असे वाटत असल्यास काही केल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होण्यास मदत होते.

नाश्ता आवश्यक

दिवसाची सुरुवात नाश्ता करुन करावी. नाश्ता दिवसातील सर्वात प्रमुख जेवण आहे. त्यामुळे शरीरातील मेटाबोलिज्म वाढते. तसेच शरीरातील कॅलरी वाढेल आणि एनर्जी आणि स्टॅमिनाही वाढण्यास मदत होईल. त्यामुळे नाश्ता हा फार आवश्यक आहे.

झोप

प्रत्येक व्यक्तीला ६ ते ७ तासांची झोप ही आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूचा आणि शरीराचा परफॉर्मेन्स चांगला राहतो. त्यामुळे झोप फार महत्त्वाची आहे. तसेच चांगली झोप येत नसेल तर योगासने करा. यामुळे चिंता, मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते.

व्यायाम

व्यायाम हा प्रत्येक व्यक्तीने करणे फार गरजेचे असते. व्यायाम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्टॅमिना वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. व्यायामाने दिवसभर उर्जा राहण्यास, स्टॅमिना वाढवण्यास मदत होते. चालणे, स्विमिंग, एरोबिक्सने फायदा होऊ शकतो. योगा, ध्यान-धारणाने ताण-तणाव दूर राहण्यास मदत होते.

संगीत

संगीत ऐकल्याने माणसाचा मूड चेंज होतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचा मूड चांगला नसेल अशावेळी संगीत ऐकावे. यामुळे माणसाचा मूड चेंज होतो. त्यासोबतच स्टॅमिना वाढवण्यास देखील मदत होते.

संतुलित आहार

स्टॅमिना आपल्या आहारावरही अवलंबून असतो. आहारावर अधिक लक्ष द्या. जेवणामुळे शरीराला चांगली उर्जा मिळते. दिवसांतून चार ते पाचवेळा थोड्या वेळाने खाणे फायद्याचे ठरते. आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. आहारात नारळाच्या तेलाचा उपयोग गुणकारी ठरतो. हे तेल पचायला हलके असून स्टॅमिना वाढवण्यासही मदत होते.

First Published on: February 27, 2020 6:30 AM
Exit mobile version