आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्यासाठी फळांचा ‘असा’ करा वापर

आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्यासाठी फळांचा ‘असा’ करा वापर

फळं खाणं आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. ऋतुनुसार बाजारात वेगवेगळी फळे येतात. मात्र, ही बाजारात येणारी फळं फक्त आरोग्यदायी नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत. फळं तुमचे सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासोबतच आपले सौंदर्य खुलवण्यासाठी देखील मदत करतात.

सौंदर्य खुलवण्यासाठी फळांचा वापर

 

संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पूड करून ती दुधात कालवा. हे तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर लावा यामुळे तेलकट त्वचेस याचा अधिक फायदा होऊन चेहरा उजळण्यास मदत होईल.

पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर दररोज चोळा त्वचेचा रंग गुलाबी होण्यास मदत होईल. ओठांवरुनही त्याचा रस फिरवा यामुळे ओठांवरील काळपटपणा कमी होईल. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी डाळिंबाची साल कच्च्या दुधात वाटा आणि ती पेस्ट चेहरा, मानेवर लावा. चेहरा सुकल्यावर धुऊन घ्या.

पपईचा गर चेहऱ्यावर चोळल्यास डाग, पुरळ कमी होण्यास मदत होते त्वचेचं आरोग्य सुधारते.

नारळपाणी नियमितपणे चेहऱ्यावर लावा त्याने चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते.

पिकलेल्या केळ्याचा गर आणि मलई मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर मधात बुडवलेल्या केळ्याच्या पातळ चकत्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवा.

सफरचंदाच्या रसात गुलाबजलाचे थेंब घालून चेहऱ्यावर लावा किंवा सफरचंदाचा गर उकडवून तो लावल्यास सावळा रंग उजळण्यास मदत होईल.


हेही वाचा :

दर पंधरा दिवसांनी का करावे फेशियल?

First Published on: August 28, 2023 3:30 PM
Exit mobile version