Monday, May 6, 2024
घरमानिनीJaggery : काळा आणि पिवळ्या गुळात हा आहे फरक?

Jaggery : काळा आणि पिवळ्या गुळात हा आहे फरक?

Subscribe

बाजारात वेगवेगळ्या प्रकाराचे गुळ मिळतात. चिकीचा गुळ, साधा गुळ, काळा गुळ असा गुळ मिळतो. तुम्ही नेमका कोणत्या प्रकारातील गुळ वापरता याचा कधीही विचार केला आहे का? काळा आणि पिवळा गुळ या दोघांमध्ये काही फरक आहे का? तुम्ही नेमका कोणता गुळ वापरायला हवा त्याचे फायदे आणि तोटे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

काळा गुळ

उसाचा रस जर तुम्ही शुद्ध अशा स्वरुपातील प्यायला असेल तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल ती म्हणजे उसाचा रस हा कधीच पिवळ्या रंगाचा नसतो. तर उसाचा रस हा कायम थोडासा काळा असतो. काळा रस हा उत्तम आणि खरा मानला जातो. त्यामुळे अगदी शुद्ध पद्धतीने केलेल्या गुळाला काळा गुळ असे म्हटले जाते. खूप जण आहारात काळ्या गुळ्याचा समावेश करतात. काळ्या गुळासोबत चणे, काळ्या गुळाचा चहा असे सेवन केले जाते.

- Advertisement -

पिवळा गुळ

शहरी भागात अनेक ठिकाणी मिळणारा गुळ हा पिवळ्या रंगाचा एखाद्या चॉकलेटप्रमाणे असतो. पिवळ्या गुळावर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे या गुळामधील अनेक पोषकतत्वे कमी झालेली असतात. त्यामुळे गुळापासून मिळणारा फायदा हा पूर्णपणे मिळत नाही. अशा गुळाच्या अधिक सेवनामुळे काही त्रासही होण्याची शक्यता असते. तुम्ही असा गुळ पदार्थांमध्ये वापरत असाल तर त्याचं प्रमाण जास्त असू नये. पिवळ्या गुळामध्ये सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट यांचे प्रमाण अधिक असते. कॅल्शियम कार्बोनेटमुळे गुळाचे वजन वाढते.

गुळ खाण्याचे फायदे

  • रोज गुळ शेंगदाणे किंवा चण्यांसोबत गुळाचे सेवन केल्यानं शरीरातील रक्तीचा कमतरता भरून निघण्यास मदत होते. विशेषतः अॅनिमियाचा त्रास असलेल्यांनी गुळाचे सेवन करायलाच हवं.
  • गुळ खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे जेवण झाल्यावर गुळाचा लहानसा खडा नेहमी चघळावा, असं सांगितलं जातं.
  • गुळामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांचे हिमोग्लोबिन कायम कमी असते. लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी गुळाचे सेवन नियमित केले पाहिजे.
  • गुळामध्ये कॅल्शियमदेखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी दररोज थोडा तरी गुळ खावा.
  • गुळाचे सेवन शरीराला उर्जा देणारे असते. गुळ खाल्ल्यानं रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे गुळ खायला हवा.

गूळ खाण्याचे तोटे

  • प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे. त्यामुळे हा नियम गुळाच्या बाबतीतही लागू होतो. एकीकडे गूळ खाण्याचे फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटेही आहेत.
  • साखरेपेक्षा गूळ शरीरासाठी पौष्टिक असला तरी तो जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची समस्या वाढू शकते. 10 ग्रॅम गुळात 9.7 ग्रॅम साखर असते. त्यामुळे गूळ खाताना तो मर्यादित खावा ही काळजी घ्या.
  • अनेक वेळा गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने अॅलर्जीचा धोका होऊ शकतो. नाक वाहणे, उलट्या होणे, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
  • तुम्ही ताज्या गुळाचे सेवन केले तर अतिसाराचा त्रास वाढू शकतो. ताजा गूळ खाल्ल्यानंतरही काही लोकांना बद्धकोष्ठतेची तक्रार असते. गुळाचा प्रभाव गरम असतो.

_________________________________________________________________

- Advertisement -

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini