Sunday, May 19, 2024
घरमानिनीReligiousपूजेमध्ये केळ्याच्या पानांना महत्व का असते?

पूजेमध्ये केळ्याच्या पानांना महत्व का असते?

Subscribe

केळीचे पान प्राचीन काळापासून पूजनीय आणि पवित्र मानले जाते. पूजेमध्ये तर केळीच्या पानांना अनन्यसाधारण महत्व आहे. खास करून देशातील दक्षिण भागाचा विचार केल्यास येथे केळीच्या पानांचा वापर पूजेच्या वेळी हमखास केला जातो. पूजेमध्ये केवळ केळीचे पानचं नाही तर केळीचं देठ, केळीचं फळं यांना देखील तितकेच महत्व आहे. शास्त्रानुसार केळीचे झाड शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. जाणून घेऊयात याचे धार्मिक महत्व,

केळ्याच्या पानांचे धार्मिक महत्व –

  • शास्त्रानुसार, केळीच्या झाडामध्ये विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा वास असतो असे म्हटले गेले आहे. त्यामुळे पूजेदरम्यान, केळीच्या पानांचा वापर केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा सैदव आपल्यावर राहते असे म्हटले जाते.
  • पूजेत केळ्याच्या पानांचा वापर केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपने पूजेचे कार्य विनाअडथळा पूर्ण होते.
  • केळीच्या झाडाचा संबंध गुरु अर्थात गुरु ग्रहाशी सुद्धा आहे. असे मानले जाते की, पूजेमध्ये केळीच्या पानांचा वापर केल्याने कुंडलीतील गुरुचे स्थान अढळ होते आणि शुभ परिणाम दिसू लागतात.
  • सत्यनारायणाची पूजा मांडताना केळीचे खांब उभारले जातात. कारण असे म्हटले जाते की, केळीच्या झाडाचा मंडप पूजास्थळाला पूर्णपणे शुद्ध करतो.
  • हिंदू धर्मात केळीचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. कोणतीही पूजा, होम, हवन आदींमध्ये केळ्याचा पानाचा वापर केला जातो. केवळ केळीचे पानच नाही तर केळीचे फळ वाण म्हणूनही देण्यात येते.
  • शास्त्रानुसार, केळीच्या पानावर केळीचा आस्वाद घेतल्याने दाम्पत्य जीवन सुखमय होण्यास मदत होते.
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला केळीचे पाने लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने सुख समृद्धी घरात नांदते.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

हेही पहा : महिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात?

Edited By – chaitali Shinde

- Advertisment -

Manini