घरदेश-विदेशLok Sabha Election 2024 : मतदान करण्यासाठी पाच पिढ्यांमधील तब्बल 70 लोक...

Lok Sabha Election 2024 : मतदान करण्यासाठी पाच पिढ्यांमधील तब्बल 70 लोक आले एकत्र

Subscribe

जोधपूर लोकसभा मतदारसंघात एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांमधील तब्बल 70 लोक मतदानासाठी पारंपारिक पोशाखात मतदानासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

जोधपूर : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघासह देशातील 89 लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. मात्र जोधपूर लोकसभा मतदारसंघात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. त्याठिकाणी एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांमधील तब्बल 70 लोक मतदानासाठी पारंपारिक पोशाखात मतदानासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. (Lok Sabha Election 2024 70 people from five generations came together to vote)

जोधपूर लोकसभा मतदारसंघात पाच पिढ्यांमधील तब्बल 70 लोक मतदानासाठी एकत्र आले होते. पुरुषांनी राजस्थानी पगडी, तर महिलांनी लाल चुनरी साडी परिधान केली होती. या कुटुंबात पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचाही समावेश होता. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, लोकशाहीचा सण उत्साहात साजरा करायचा हे आम्ही ठरवले होते. राजस्थानच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पगडी पुरुष घालतील आणि स्त्रिया चुनरी साडी नेसतील, असे आम्ही ठरवले होते. आमच्या कुटुंबातील काही लोक पहिल्यांदाच मतदान करत आहेत. भारताचे नाव जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही म्हणून ओळखले गेले पाहिजे, असा संदेश आम्हाला जनतेला द्यायचा आहे, असेही सदस्याने स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कुऱ्हाडीने EVM फोडल्याप्रकरणी तरुणाला अटक; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

दरम्यान, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे भाजपाकडून राजस्थानमधील जोधपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसने राजपूत समुदायातून करण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. 2014 आणि 2019 मध्येही या जागेवरून गजेंद्र सिंह शेखावत विजयी झाले होते, त्यामुळे यावेळीही भाजपाने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

- Advertisement -

600 आदिवासींवर मतदानाचा बहिष्कार (Boycott of voting on 600 tribals)  

दरम्यान, आज त्रिपुरा पूर्वमध्ये एका जागेवर मतदान होत आहे. मात्र येथे खराब रस्त्यांमुळे 600 हून अधिक आदिवासी मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या धलाई जिल्ह्यातील एका दुर्गम आदिवासी गावातील 600 हून अधिक मतदारांनी 7 किलोमीटर लांबीच्या गावाच्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, सुमारे 900 लोकसंख्या असलेला हा समाज अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहे.

हेही वाचा – Lok Sabha : ऐन निवडणुकीत ठाण्यात सापडले ईव्हीएम अन् हजारो मतदान कार्ड, आव्हाडांकडून संताप

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -