उन्हाळ्यात मेकअप करताना

उन्हाळ्यात मेकअप करताना

एप्रिल-मे महिना आला म्हणजे लग्नसराईचे दिवस सुरू होतात. दागिन्यांपासून पेहरावापर्यंत सर्वच बाबी आपण चोखंदळपणे निवडतो. मात्र ऐन कार्यक्रमादिवशी मेकअप खराब झाल्यास आपण निराश होतो. त्यामुळे घामानं मेक-अप खराब होणार नाही ना, ही चिंता आपल्याला सतावत राहते. मात्र मेकअप करताना काही नियमांचे पालन केल्यास कार्यक्रमात आपण आपले वेगळेपण नक्कीच जपू शकतो.

फाऊंडेशन विसरा प्रायमर वापरा – उन्हाळ्याच्या दिवसात फाऊंडेशनचा वापर न केलेलाच बरा. फाऊंडेशनला उत्तम पर्याय आहे प्रायमर. चांगल्या दर्जाच्या प्रायमरचा पातळ व हलका थर लावा. प्रायमरने त्वचा उजळून दिसते तसंच मेकअपही टिकून राहतो आणि सर्वात महत्त्वाचं चेहरा घामेजलेला किंवा तेलकट न दिसता टवटवीत दिसतो.

आयशॅडो : गरमीच्या दिवसात क्रीम किंवा प्रेस्ड पावडर आयशॅडो उत्तम आहेत. कारण डोळ्यांना ते बसतातही आणि घामाने इतस्तत: पसरण्याची शक्यताही कमी असते. सिलिकॉन बेस्ड आयशॅडो हाही एक चांगला पर्याय आहे. आयशॅडो अप्लाय करण्याआधी पापण्यांना आयशॅडो प्रायमर लावावे. यामुळे कलर व्हाईब्रन्ट राहतो आणि घामाने येणार्‍या क्रीज-लाइन्सनाही रोखतो.

लाइनर व मस्कारा : वाटरप्रूफ लाइनर किंवा मस्कारापेक्षा वॉटर रेझिस्टंट लायनर किंवा मस्कारा जास्त योग्य ठरेल. वॉटर रेझिस्टंट लायनर किंवा मस्कारा तुलनेने सॉफ्ट आहेत.

पर्समध्ये कॉम्पॅक्ट असू द्या – टच-अप करण्यासाठी आणि नको असलेली चेहर्‍यावरील शाईन किंवा ऑईल घालवण्यासाठी कॉम्पॅक्ट लावावा. ब्लॉटिंग पेपरनेही चेहर्‍यावर जमा झालेले ऑईल टिपता येते. ब्लॉटिंग पेपरने चेहरा अलगद टिपून घ्यावा, घासू नये.

लक्षात ठेवा –
१. उन्हाळ्यात केवळ घामाने मेकअप खराब होत नसून त्वचेवर जमा होणार्‍या ऑईलने जास्त खराब होतो. इतर कुठल्याही ऋतूपेक्षा उन्हाळ्यात त्वचा जास्त प्रमाणात ऑईल बाहेर टाकते. त्यामुळे फेस क्लिन्सर घेताना ऑईल-फ्री आहे याची खात्री करून घ्या.

२ उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडू नका. त्वचेच्या संरक्षणासाठी चांगले SPF (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन वापरा. प्रीमॅच्युअर, मॅच्युअर एजिंग, पिग्मेंटेशन, सन बर्न किंवा तत्सम प्रकारची हानी टाळण्यासाठी सनस्क्रीनचा वापर अत्यावश्यक आहे.

३ सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेकअप- जितका कमी तितका चांगला.

First Published on: March 17, 2019 4:57 AM
Exit mobile version