लग्नानंतर मुलींचे वजन का वाढते?

लग्नानंतर मुलींचे वजन का वाढते?

लग्नात फिट आणि बारीक दिसण्यासाठी मुलं-मुली खूप मेहनत करतात. त्यासाठी जिम जातात योगा करतात. मात्र, एकदा डोक्यावर अक्षता पडल्या की हळूहळू नवे नवरा-नवरी जाड दिसू लागतात. यामागचे कारण म्हणजे आयुष्यात झालेले बदल याचं बदलांमुळे शरीरावर आणि मनावर देखील अनेक बदल होतात.दरम्यान, लग्नानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वजन लवकर आणि जास्त प्रमाणात वाढते.

लग्नानंतर मुलींचे वजन का वाढते?

खाण्यात बदल
लग्नानंतर मुलं आणि मुली दोघांच्या आयुष्यात बदल होतात. परंतु जास्त बदल मुलीच्या आयुष्यात होतात. नवीन जागा, नवीन लोक तसेच घरातील कार्यक्रम यांमुळे खाण्यात अनेक बदल होतात. ज्यामुळे हळूहळू वजन वाढू लागते.

तणाव
लग्नानंतर झालेल्या अनेक बदलांमुळे मुलींना तणावाचा सामना करावा लागतो. नवीन घर, नवीन नाती या सर्व गोष्टी सांभाळताना येत असलेल्या तणावामुळे देखील वजन वाढू शकते.

अपूर्ण झोप
लग्नानंतर घरातील विविध कार्यक्रमांमुळे झोप पू्र्ण होत नाही, या अपूर्ण झोपेमुळे देखील मुलींचे वजन वाढते.

कमी हालचाल
लग्न आणि त्यानंतरच्या सर्व कामांमुळे फारशी शारीरिक हालचाल होत नाही. त्यामुळे हळूहळू वजन वाढू लागते.

हार्मोंस बदल
लग्नानंतर वजन वाढण्यामागे मुख्य कारण शरीरात होणार हार्मोंस बदल आहे. सेक्सुअल लाईफमुळे हे बदल अधिक होतात. ज्यामुळे महिलांचे वजन वाढते.

उशीरा लग्न
कधी कधी लग्नानंतर वजन वाढण्यामागे उशीरा लग्न हे देखील कारण असू शकते. अलीकडे मुली उशीरा लग्न करण्यास पसंती देतात. मात्र, त्यामुळे वजन अधिक प्रमाणात वाढते.

 


हेही वाचा :

सतत नखं कुरतडण्याची सवय तुम्हाला पडू शकते महागात; कारण…

First Published on: February 5, 2023 3:40 PM
Exit mobile version