हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना ‘या’ चूका टाळा

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना ‘या’ चूका टाळा

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना 'या' चूका टाळा

आपली त्वचा चमकदार, ग्लोईंग असावी ही प्रत्येकाची आवड असते. सगळ्यांना असे वाटत असते की, आपली त्वचा कायम निस्तेज आणि सुंदर असावी. मात्र, हिवाळ्याच्या दिवसात त्वचा निर्जीव होते. यामुळे आपण त्वचेची विशेष काळजी घेतो. परंतु, यादरम्यान आपण काही चूका करतो. त्या कोणत्या चूका टाळणे गरजेचे आहे. जाणून घेऊया.

पिलिंग

त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवण्यासाठी आणि त्वचा एक्सफ्लोइट करण्यासाठी अनेकदा तरुणी पिलिंगची मदत घेतात. मात्र, हिवाळ्याच्या दिवसात अशाप्रकारच्या ट्रीटमेंट मदत करत नाहीत. उलट यामुळे त्वचेवरील नैसर्गिक ऑईल काढले जाते.

स्क्रबिंग

स्क्रबिंग मधील ग्रॅन्युएल त्वचेला त्रासदायक ठरू शकतात. यामुळे त्वचेवर जळजळ वाढते. तसेच चेहर्‍यावरील तेलाचे प्रमाणे कमी होते.

गरम पाणी

हिवाळ्याच्या दिवसात ऊब मिळावी म्हणून अनेकजण गरम पाण्याचा वापर करतात. पण यामुळे त्वचेतील तेलाचे प्रमाण कमी होते. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचेमध्ये मॉईश्चर टिकून रहावे म्हणून योग्य मॉईश्चरायझरचा वापर करावा.

क्लिंजिंग

क्लिंजिंग प्रोडक्टमध्ये खूप प्रमाणात केमिकल्स असतात. यामुळे त्वचेतील शुष्कता वाढते. कारण त्वचेतील तेल शोषले जाते. त्यामुळे स्किन केअर निवडणार असाल तर ती ऑईल बेस्ड निवडा.

मॅट कॉस्मॅटिक

हिवाळ्याच्या दिवसात मॅट कॉस्मॅटिकचा वापर केल्यास त्वचेतील नैसर्गिक स्वरूपातील तेलाचे प्रमाण कमी होते.

कॉस्मॅटिक लिपस्टिक

अनेकदा ओठांवर कॉस्मॅटिक लिपस्टिक वापरली जाते. मात्र, हिवाळ्यात कॉस्मॅटिक लिपस्टिक वापरणे टाळावे.

फेसवॉश

थंडीच्या दिवसांत दोन वेळापेक्षा अधिकवेळ फेसवॉश वापरणं टाळा. यामुळे त्वचेचे नुकसान अधिक होते. तसेच हिवाळ्यात फेसवॉश निवडताना त्यामध्ये ऋतूमानानुसार आवश्यक असणारी मॉईश्चरबेस्ड घटक असणे आवश्यक आहे.

First Published on: November 29, 2019 6:00 AM
Exit mobile version