हिवाळ्यातील विशेष रेसिपी: सुखडीचे लाडू

हिवाळ्यातील विशेष रेसिपी: सुखडीचे लाडू

हिवाळा सुरू झाला की आपण वेगवेगळे प्रकारचे लाडू करतो. कारण थंडीत गरम पदार्थांचे सेवन करावे असं म्हटलं जातं. अशावेळी उष्ण गुणात्मक, शरीरात आणि त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता निर्माण करणारे, तसेच कफनाशक आणि वातनाशक पदार्थ पोटात गेलेले चांगले असतात. त्यामुळे आज आपण सुखडीचे लाडू कसे करतात हे पाहणार आहोत.

साहित्य 

दीड वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी साजूक तूप, अर्धा चमचा सुंठ पावडर, भरड केलेला सुका मेवा, मनुके, दोन चमचे डिंक, तीन चमचे खारीक पुड, थोडीशी वेलची पुड, किस्सून घेतलेला गूळ सव्वा वाटी

कृती 

सर्वप्रथम कडईत तूप गरम करा. तूप चांगले तापल्यानंतर डिंक तळून घ्यावा. डिंक हा फुलेपर्यंत तळायचा. त्यानंतर जेव्हा डिंक थंड होईल तेव्हा तो हाताने किंवा मिक्सरने बारीक करायचा. मग कडईत असलेल्या तुपात मंद आचेवर गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे. मग त्यानंतर बारीक केलेला सुका मेवा, मनुके, खारकेची पुड आणि वेलची पावडर घालावी. या सर्व मिश्रणात बारीक केलेला डिंक घालावा. त्यानंतर यात सुंठ पुड घालून सर्व मिश्रण एकत्र कडईत हालवून घ्यावे. मग या मिश्रणात बारीक केलेला गूळ घालावा. हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू तयार करावे.


हेही वाचा – कसे करतात खमंग ‘हिरव्या मुगाचे डोसे’?


 

First Published on: February 4, 2020 6:15 AM
Exit mobile version