कसे करतात खमंग ‘हिरव्या मुगाचे डोसे’?

दररोजच्या नाश्त्यात पोहे, उपमा खाऊन कंटळा आलाय तर मग अतिशय सोपे आणि खमंग ‘हिरव्या मुगाचे डोसे’ कसे करतात ते आपण आज जाणून घेणार आहोत.

साहित्य

अर्धा कप अख्खे मुग, अर्धा कप मुगडाळ, अर्धा कप तांदूळ, आले, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, पाणी आवश्यकतेनुसार

कृती

सर्व प्रथम हिरव्या मुगाचा डोसा बनवताना १/२ कप अख्खे मुग, मुगडाळ अर्धा कप, अर्धा कप तांदूळ घेऊन ते साधारण ३ ते ४ तास एकत्रित भिजवून घ्यायचे. अख्खे मुग, डाळ आणि तांदूळ एकत्रित भिजवून घेतल्यावर मिक्सरमधून वाटून घेताना त्यात आले, कोथिंबीर, हिरवी मिरचीचे दोन ते तीन तुकडे, जिरे घालायचे याची एकत्रित पेस्ट तयार होते. एकत्रित वाटून झालेले पिठ एका बाउलमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ घालायचे. यानंतर तयार पिठाचे डोसे करण्यासाठी एका पॅनमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून गरमा गरम डोसे तयार करायचे. अशा प्रकारे गरमा गरम हिरव्या मुगाचे डोसे खाण्यासाठी तयार होतात.