लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागील ‘ही’ आहेत कारणं

लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागील ‘ही’ आहेत कारणं

लग्नापूर्वी महिला फिट आणि हेल्दी असल्याचे दिसून येतात. पण लग्नानंतरच्या काही दिवसांनी त्यांचे वजन वाढलेले दिसते. तुम्ही सुद्धा हा बदल पाहिला असेल. पण यामागे काही कारणं असू शकतात. यामध्ये हार्मोनल बदलावासह मनोवैज्ञानिक कारणांचा सुद्धा समावेश असू शकतो. काही महिला तणाव किंवा चिंतेत असल्याने वजन वाढू लागते. वेळेवर खाणंपिणं, आरोग्याची काळजी न घेणे आणि शारिरीक रुपात सक्रिय न राहिल्याने ही महिलांचे वजन वाढते. अशातच जाणून घेऊयात लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागील नक्की कारणं काय असतात त्याच बद्दल अधिक.

-तणाव वाढतो


तणावाचा स्तर अधिक असल्याने लग्नानंतर महिलेचे वजन वाढते. तणाव हे त्यामागील मुख्य कारण असते. खरंतर लग्नानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या वाढल्या जातात. तसेच नव्या परिवारासोबत ताळमेळ बसणे हे एका आव्हानात्मक स्थितीसारखेच असते. यामुळेच काही महिलांना तणाव येऊ लागतो. परिणामी त्यांच्यामधील मेटाबॉलिज्म कमी होऊ लागतो आणि वजन वेगाने वाढू लागते. त्यामुळेच असे म्हटले जाऊ शकते की, लग्नानंतर जर महिला तणावाखाली असतील तर त्यांचे वजन वाढू शकते.

-मेटाबॉलिज्म रेट कमी होतो


आजकाल बहुतांश लोक वयाच्या 30 व्या वर्षी किंवा त्यानंतर ही लग्न करतात. हेल्थ एक्सपर्टनुसार, वयाच्या तीसाव्या वर्षानंतर मेटाबॉलिज्मचा रेट कमी होऊ लागतो. यामुळे सुद्धा महिलांचे वजन वाढू लागते. म्हणजेच मेटाबॉलिज्म सुद्धा महिलांचे वजन वाढण्यामागील एक कारण ठरु शकते.

-जेवणाची अनियमित वेळ


लग्नानंतर महिलेवरील जबाबदाऱ्या वाढल्या जातात. घर-परिवाराला, मुलांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर येते. अशातच ती आपल्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही. घरातील मंडळींच्या खाण्यापिण्याकडे ती नेहमीच लक्ष देते. पण स्वत: कडे लक्ष देत नाही.तिच्या खाण्यापिण्याची वेळ ही बदलली जाते. अशातत तिचे वजन कालांतराने वाढू शकते.

-शारीरिक संबंध


लग्नानंतर सेक्शुअल अॅक्टिव्हिटी अधिक होत असेल तरीही वजन वाढते. खरंतर सेक्शुअल अॅक्टिव्हिटी केल्यानंतर महिलांमध्ये हार्मोनल बदल होऊ लागतात. सेक्स केल्यानंतर काही महिलांना गोड खावेसे वाटते. अशातच केक, आइस्क्रिम, गोड पदार्थ खाल्ले जातात. यामुळे सुद्धा महिलांचे लग्नानंतर वजन वाढल्यासारखे दिसू शकते.

-व्यायामाचा अभाव


लग्नापूर्वी महिला आपल्या हेल्थ आणि फिटनेसकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे त्या दररोज एक्सरसाइज करतात. परंतु लग्नानंतर काही महिला ऑफिस आणि घराच्या कामांत ऐवढ्या व्यस्त होतात की, त्यांना जिमला जाणे किंवा व्यायाम करण्यासाठी वेळ ही मिळत नाही. अशातच त्या शारीरिक रुपात सक्रिय नसल्याने त्यांचे वजन वाढू लागते. वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर दररोज थोडावेळ तरी व्यायाम केलाच पाहिजे.


हेही वाचा- आई व्हायचंय मग ‘या’ 4 गोष्टींवर द्या लक्ष

First Published on: May 24, 2023 12:26 PM
Exit mobile version