Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthएकाग्रतेसाठी करा 'ही' योगासने

एकाग्रतेसाठी करा ‘ही’ योगासने

Subscribe

मेंदू शांत राहण्यासाठी योगा फार मदत करतो. यामुळे मनातील चंचलता दूर होतेच पण त्याचसोबत तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करता. योगा हा तुमचा ताण कमी करण्यास फायदेशीर ठरतो. मात्र सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे तणाव. याच कारणास्तव आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येत नाही. एकाग्रतेसाठी तुम्ही पुढील काही योगासने नक्कीच करू शकता.

-बद्धकोणासन
बद्धकोणासन आपलं डोक शांत आणि मनातील नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करतो. परंतु ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी एक्सरपर्ट्सच्या मदतीने हे योगासन करावे.

- Advertisement -

-पादोत्तानासन
हे योगासन केल्याने तणावामुळे निर्माण होणाऱ्या मान आणि डोके दुखीची समस्या दूर होते. त्याचसोबत तुम्ही रिलॅक्स राहता.

-मार्जरी आसन
मार्जरी आसन केल्याने तुम्ही शांत होता. त्याचसोबत एखाद्या गोष्टीत एकाग्रता मिळवणे कठीण होत असेल तर हे आसन नक्की करा.

- Advertisement -

-बालासन
बालासन तुमच्या शरीराला आणि मनाला शांत ठेवण्यास मदत करते. ज्या लोकांना गुडघे दुखीची समस्या आहे त्यांनी हे आसन करू नये. बालासन केल्याने एंग्जायटी आणि हायपरटेंन्शनमुळे होणारी उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून दिलासा मिळतो.

-विपरीत करणी आसन
हे योगासन केल्याने कंबर दुखीपासून आराम मिळतो. त्यामुळे डोक शांत राहते. मनातील नकारात्मक भावना काढण्यासाठी हे योगासन मदत करते. त्याचसोबत स्ट्रेस आणि एंग्जायटीसाठी उत्तम आहे.


हेही वाचा- Cozy cardio म्हणजे काय?

- Advertisment -

Manini