प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

राहुल गांधींचा करिष्मा चालेनासा झाल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधींना पुढे केल्याची टीका अनेकांनी केली. मात्र, प्रियांका गांधींनीच स्वत: राहुल गांधींना ‘सपोर्टिव्ह’ भूमिकेत राहणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे टीकाकारांना उत्तरही मिळालं आहे आणि चापही बसला आहे.
A view of the sea
Rashmi Mane

प्रियंका गांधी यांनी त्यांचं ट्विटर अकाऊंट फेब्रुवारी २०१९ मध्येच सुरू केलं आहे. मात्र, त्यावरुन त्यांनी मंगळवारी रात्री पहिलंच ट्वीट केलं.

Pravin Wadnere

राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियांका गांधींमुळे काँग्रेसला पूर्वांचलमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी फायदा होऊ शकतो, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे महाआघाडीचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा :

काॅंग्रेसची मतं आणि भाजपाच्या जागा वाढवणार प्रियांका गांधी!
Pravin Wadnere

उत्तरप्रदेशचे भाजप खासदार हरीश द्विवेदी यांनीही आता प्रियांका गांधींवर निशाणा साधला आहे. प्रियांका यांच्या पेहरावाबद्दल द्विवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘प्रियांका गांधी दिल्लीमध्ये जीन्स घालतात. मात्र, मतदारसंघात साडी नेसून, कुंकू लावून फिरतात’, असं वक्तव्यं द्ववेदी यांनी केलं आहे.

सविस्तर वाचा :

प्रियांका मतदारसंघात साडी, तर दिल्लीत जीन्स घालतात – हरीश द्विवेदी
Pravin Wadnere

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे काँग्रेस लावलेल्या पोस्टरवर राहुल गांधी यांना राम तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणच्या अवतारात दाखवण्यात आले होते. तर आता उत्तर प्रदेशमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टर्समधून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दुर्गा माँच्या अवतारात दाखवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा :

‘राहुल राम तर प्रियांका दुर्गा माँ’; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली देवाची उपमा
Pravin Wadnere

प्रियांका गांधी वाड्रा यांच्या राजकारणातल्या प्रवेशापेक्षाही किंबहुना त्यांच्या ट्विटरवरच्या प्रवेशाची चर्चा जास्त झाली. ट्विटवर पहिल्या काही तासांमध्येच तब्बल लाखभर फॉलोअर्स प्रियांका गांधींना मिळाले. एवढंच काय, एकही ट्विट न करता प्रियांका गांधींचे तब्बल ४० हजार फॉलोअर्स झाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रियांका गांधी हे नाव पुढच्या काही महिन्यांमध्ये तुफान चालणार याचंच हे द्योतक होतं. मात्र, असं असतानाच एक प्रश्न काही नेटिझन्सकडून विचारला जात आहे. ट्विटरकडून अकाउंट व्हेरिफिकेशनची सेवा जुलै २०१८पासूनच बंद असताना प्रियांका गांधींना लगेचच व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट कसं मिळालं?

सविस्तर वाचा :

प्रियांका गांधींना व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंट मिळालंच कसं?
First Published on: February 26, 2019 3:56 PM
Exit mobile version