दूधाचे दर वाढण्याची शक्यता

दूधाचे दर वाढण्याची शक्यता

दूधाचे दर वाढणार?

राज्यात दूधाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी लागू केल्याने दुधाच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्लॅस्टिक पिशवीऐवजी काचेच्या बाटलीतून ग्राहकांना दूध द्यावे लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर प्रतिलिटर दुधामागे १० ते १५ रुपयांचा वाढीव भार पडजणार असल्याचे मत राज्य दूध कल्याणकारी खासगी दूध उत्पादकांच्या संघाने स्पष्ट केले आहे.

म्हणून वाढणार दूधावरी किंमती

प्लॅस्टिकबंदी झाल्याने आता दूध काचेच्या बाटलीतून द्यावे लागणार आहे. त्यामुळे काचेच्या बाटलीतून दूधाची विक्री केल्यास दूधाचे भाव वाढवण्याची शक्यता आहे. प्लॅस्टिकबंदीतून दुधाला वगळावे अशी मागणी दूध उत्पादकांची आहे. मात्र या निर्णयाला सरकारने ठाम नकार दिला. या पार्श्वभूमीवर खासगी दूध उत्पादकांची पुण्यात बैठक झाली. यावेळी सरकारने दुधाला प्लॅस्टिकबंदीतून वगळण्याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास दूध उत्पादक आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला असून खासगी दूध उत्पादकांनी भाववाढीला इशारा देखील दिला आहे.


वाचा – दूध भेसळ करणार्‍यांना जन्मठेप


उत्पादकांनी भाववाढीच्या धमक्यांना सरकार घाबरणार नाही

दूध उत्पादकांनी दुधाचे भाव वाढवण्याच्या धमक्या देऊ नयेत. अशा धमक्यांना सरकार घाबरणार नसल्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच खासगी दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना सरकारने योजना दिली आहे. अर्धा लिटर दुधाचा पाऊच देताना ५० पैसे तर एक लिटरचा पाऊच देताना ग्राहकांकडून एक रुपया डिपॉझिट घेतले पाहिजे. तसेत हा निर्णय आपल्या भावी पिढीसाठी आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान उत्पादक म्हणतात त्याप्रमाणे दुधाची कोणतीही दरवाढ होणार नसून आपण मंगळवारी उत्पादकांनी बैठक बोलावल्याचे त्यांनी सांगितले आहे.


वाचा – दूधातील भेसळ ८ टक्क्यांनी वाढली, सीजीएसआयचा अहवाल


 

First Published on: December 8, 2018 12:20 PM
Exit mobile version