CoronaVirus: टपाल कर्मचाऱ्यांना दहा लाख नुकसान भरपाई देणार!

CoronaVirus: टपाल कर्मचाऱ्यांना दहा लाख नुकसान भरपाई देणार!

टपालखात्याचे काम हे अत्यावश्यक सेवेत गणले जाते. कोविड-१९ च्या संदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन, टपाल कर्मचारी ड्युटीवर असताना या आजाराला बळी पडल्यास १० लाखाची भरपाई देण्याचे ठरवण्यात आले आहे. ग्रामीण डाक सेवकांसह सर्व टपाल कर्मचाऱ्यांना हे लागू असेल. या संबधीचे निर्देश लगेचच अंमलात येतील आणि ते कोविड-१९ चे हे संकट ओसरेपर्यंत लागू असतील.

ग्रामीण डाक सेवकांसह सर्वच टपाल कर्मचारी ग्राहकांना टपालाशिवाय विविध सेवा पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. यात पोस्टल बचत खाते (पोस्ट ऑफिस सेव्हींग बँक), पोस्टल जीवन विमा, कोणालाही कोणत्याही बँकेतून पैसे काढण्याची आधारकार्ड आधारित पैसे काढण्याची सुविधा (AePS) या सारख्या अनेक सेवांचा समावेश आहे. याशिवाय टपाल खाते स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या योग्य परवानगीने कोविड-१९ संच, खाद्यपदार्थाची पाकिटे, आणि औषधे देशाच्या विविध भागात पोचवतात. अशा प्रकारे टपाल कर्मचारी आपल्या दैनंदिन विभागीय कार्याप्रमाणेच, कोविड-१९च्या या संकटकाळात सामाजिक कार्यातही सहभागी होत आहे.


हेही वाचा – भारतात कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा पद्धतीने उपचार करण्यासाठी चाचणीला मान्यता


 

First Published on: April 18, 2020 9:19 PM
Exit mobile version