घरताज्या घडामोडीभारतात कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा पद्धतीने उपचार करण्यासाठी चाचणीला मान्यता

भारतात कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा पद्धतीने उपचार करण्यासाठी चाचणीला मान्यता

Subscribe

कोविड -१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांच्यावर प्लाझ्मा पद्धतीने उपचार करण्यासाठी तशी चाचणी करण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केली होती. त्याला केंद्रीय औषध नियंत्रकांनी मंजुरी दिली आहे.

केंद्रीय औषध नियंत्रकांनी म्हटले आहे कि, आयसीएमआरने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला या संस्थांची यादी सादर केली होती ज्यांनी या चाचणीत रस दर्शविला होता. जनहितार्थ अशा चाचण्या करण्याच्या आयसीएमआरच्या प्रस्तावावर १ एप्रिल रोजी विषय तज्ञांच्या समितीच्या बैठकीत चर्चा झाली आणि कोविड -१९ची सद्यस्थिती पाहता त्वरित मान्यता देण्यात आली. औषध आणि नियमावली चाचणी नियम, २०१९च्या नियम आणि मानकांनुसार काही मानके आणि दुरुस्ती करून, सीडीएससीओने क्लिनिकल चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. कोविड -१९च्या रूग्णांच्या रक्तातील अँटीबॉडीज घेऊन प्लाझ्मा थेरपीने त्या गंभीरपणे संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला आहे तर शनिवारी एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १४,३७८ पर्यंत वाढली. कोविड -१९ वर सध्या वैध उपचार नाही. आयसीएमआरने नमूद केले की विविध उपचारांचे मूल्यांकन केले जात आहे. त्यासाठी जगभरात अनेक चाचण्या घेत आहेत.


हेही वाचा – खुशखबर! एअर इंडियाची तिकीट बुकिंग सुरू होणार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -