10th and 12th Exam Date: १०वी, १२वीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर

राज्यातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल यादरम्यान होणार आहेत. तर १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहे. तसेच १२वीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर १०वीचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ‘सध्या आपण ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सातत्याने मॉनिटरिंग करत आहोत. दरम्यान १०वी आणि १२वीचं वर्ष विद्यार्थी आणि पालकांचा दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे सातत्याने या परीक्षा कशा होणार? कधी होणार? याबाबत आम्हाला विचारणा होत असते. उच्च माध्यमिक शालांत म्हणजे इयत्ता १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्याचबरोबर माध्यमिक शालांत म्हणजे इयत्ता १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. याव्यतिरिक्त ज्या काही प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा असतील, त्यामधील १२वीच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत होणार आहे. तर १०वीची परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्चपर्यंत होणार आहे.

इयत्ता १०वीच्या परीक्षांचे वेळापत्रक

इयत्ता १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक

तसेच वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, ज्याप्रमाणे गेल्या वर्षी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाली, त्याप्रमाणे यावेळेस देखील ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. तसेच पेपर स्वरुप आणि मुल्यमापन मागच्या वर्षी जे होते, तसेच असणार आहे.


हेही वाचा – मुंबई विद्यापिठाचे भूखंड लाटण्याच्या मुहूर्तमेढीसाठी नवा कायदा – आशिष शेलार


 

First Published on: December 16, 2021 6:25 PM
Exit mobile version