धक्कादायक! पुण्यात २४ तासांत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू

धक्कादायक! पुण्यात २४ तासांत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर पुण्यात कोरोना विषाणूबाबत चिंता अधिकच वाढली आहे. पुण्यात २४ तासांत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून यामध्ये जुन्नर आणि शिरुर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुण्यात कोरोना चाचणीची संख्या वाढली असली ३०२ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. तर १८६ जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या देखील आता वाढत आहे.

४७ हजार ७६१ चाचण्या झाल्या

पुण्यामध्ये १ हजार १७९ एवढ्या चाचण्यांचे नमुने घेण्यात आले असून आतापर्यंत ४७ हजार ७६१ चाचण्या झाल्या आहेत. तर १६६ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यातील ४५ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच सध्या २ हजार ३४० एवढे रुग्ण उपचार घेत आहेत.

एका दिवसांत २२८ कोरोनाबाधित

पुण्यात एका दिवसांत २२८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पिंपरी चिंचवडमधील २८ रुग्ण आढळले आहेत. पुणे कँटोन्मेंटमध्ये २१ रुग्ण तर पुणे ग्रामीणमध्ये २५ रुग्ण आढळले आहेत.

राज्यात ११६ मृत्यू

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ११६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची राज्यातली संख्या २०९८ झाली आहे. त्यासोबतच आज राज्यात तब्बल २ हजार ६८२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६२ हजार २२८ झाला असून त्यातले ३३ हजार १२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा २६ हजार ९९७ झाला आहे.


हेही वाचा – मुक्त विद्यापीठातर्फे 10 कोटी


 


 

First Published on: May 29, 2020 11:39 PM
Exit mobile version