घरताज्या घडामोडीमुक्त विद्यापीठातर्फे 10 कोटी

मुक्त विद्यापीठातर्फे 10 कोटी

Subscribe

मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना सुपुर्द

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने करोना साथीविरूद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जाहीर केलेली 10 कोटी रूपयांची मदत गुरुवारी (दि.28) नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपुर्द केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
मुक्त विद्यापीठाने समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी गेली 30 वर्ष भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे हे केवळ शिक्षण देणारे विद्यापीठा नसून ही महाराष्ट्राची व्यापक चळवळ असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी काढले.
कुलगुरू वायुनंदन यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या विकासासाठी प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला. तसेच याचेच पहिले पाऊल म्हणून मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्राला ग्रो अ‍ॅम्ब्युलन्स लवकरच उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले. या वेळी विद्यापीठाचे वित्तअधिकारी एम. बी. पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, उपकुलसचिव विवेक ओक, कैलास मोरे, चंद्रकांत पवार, कैलास मोहिते उपस्थित होते.

‘मुक्त’ संशोधन व्हावे
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सामाजिक व्यवहारावर, संस्कृतीवर, कृषी क्षेत्रावर झालेल्या चांगल्या वाईट परिणामांबाबत मुक्त विद्यापीठाने व्यापक संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -