नाशकात शुक्रवारी रात्री ११ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

नाशकात शुक्रवारी रात्री ११ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक जिल्हा प्रशासनास शुक्रवारी (दि.२२) रात्री ८ वाजता १२ रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. बाधित रुग्णांमध्ये ११ जण नाशिक शहरातील आहे. तर, एकजण मालेगाव शहरातील आहेत. आता नाशिक शहरात ६७ रुग्ण बाधित असून जिल्ह्यात एकूण ९०३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. शहरात पुन्हा ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अंबड लिंकरोड ६, साठेनगर, वडाळागाव १, रामनगर, पेठरोड, पंचवटी १, इंदिरा गांधी परिसर, सिडको १, हमीदनगरमधील २ जण बाधित आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागातर्फे बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन केले जात आहे.

५१ रुग्ण दाखल

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२२) ५१ जणांना करोनासदृश्य लक्षणे आढळून आले आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय १०, मालेगाव महापालिका रुग्णालय २४ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात १७ जण दाखल झाले आहेत.

३१६ अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत 9 हजार 447 संशयित रुग्णांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये 8 हजार 240 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह व ८९१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ६५४ बरे असून १९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ३१६ संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक शहर ७३, मालेगाव शहर १२५ आणि नाशिक जिल्ह्यातील ११८ संशयित रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण —-891 (बरे ६५४)
मालेगाव ——–६८५ (बरे ५०४, मृत ४३)
नाशिक शहर —–67 (बरे ३७, मृत ३)
जिल्ह्या बाहेरील —-३९(बरे २८)
नाशिक ग्रामीण—-१11 (बरे ८५)
नाशिक तालुका —९
चांदवड——–५
सिन्नर———९
दिंडोरी ——–९
निफाड ——–१६
नांदगाव ——–१०
येवला ———३३
कलवण ——–१
मालेगाव तालुका—-१७
बरे झालेले रुग्ण—-६५४

First Published on: May 22, 2020 8:41 PM
Exit mobile version