पर्यटन मंत्र्यांचा दौरा कोकणासाठी विकासाचा दौरा, ११६ कोटींचा निधी मंजूर

पर्यटन मंत्र्यांचा दौरा कोकणासाठी विकासाचा दौरा, ११६ कोटींचा निधी मंजूर

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्याचा कोकण दौरा यशस्वी ठरला असून दौरा संपताच त्यांनी कोकण पर्यटनासाठी 116 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवाय मालवण येथील फिश एक्वारेम साठी सुद्धा 25 कोटीचा निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे आता कोकणच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याची माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली

28, 29 आणि 30 मार्चला पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण दौरा केला हा संघर्षाचा आहे की विकासाचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात होता परंतु पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणच्या विकासाचा दौरा केला होता हे दाखवून दिले आहे, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे कोकणात 99 टक्के आमदार खासदार महाविकास आघाडीचे आहेत पर्यटनमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात बालेकिल्ला काय असतो हे दिसून आले आहे कोकण दौरा करून पर्यटनमंत्री मुंबईत जाताच तात्काळ शासन आदेश काढून कोकण पर्यटन विकासासाठो 116 कोटी रुपये मंजूर केले आहेत यामध्ये लोकसंख्येच्या निकषावर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठो 23 कोटी 13 कोटी,रत्नागिरी जिल्ह्यसाठी 25 कोटी,रायगड जिल्ह्यासाठो 60 कोटी व मुंबई उपनगर सह अन्य जिल्ह्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा निश्चितपणे यशस्वी ठरला आहे वर्षभरात पर्यटनाची कामे होऊन विकासाला चालना मिळणार आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 23 कोटी 13 लाखाच्या निधीमधून गजबा देवी मंदिर 5 कोटी, कुडाळ भगसाळ नदी पर्यटन सुविधा 5 कोटी,मालवण किल्ला 4 कोटी 75 लाख, नेरूर कलेश्वर मंदिर 3 कोटी,तारकर्ली 3 कोटी,मालवण किल्ला लायटिंगसाठी 3 कोटी दिले जाणार आहेत त्याशिवाय मालवण मध्ये फिश एकवारेम साठो स्वतंत्र 25 कोटी रुपये मंजूर केले असून त्याला लागणारी जागा अधिसूचित करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून 2 कोटी दिले जाणार आहेत त्यामुळे जिल्ह्याला पर्यटन विकासासाठी सुमारे 50 कोटी रुपये मिळणार आहेत

तसेच विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ला संवर्धनासाठी घेतले असून मालवण किल्ल्यावर नळपाणी योजनेसाठी 1 कोटी 42 लाख मंजूरही केले आहेत पंचतारांकित हॉटेल्सही होऊ घातली आहेत त्यामुळे पर्यटन विकासा बरोबरच रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले जिल्ह्यात पर्यटन अधिकारी पूर्णवेळ राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे तर जिल्ह्यतील 80 टक्के प्रमुख रस्त्याची कामे होऊन गुळगुळीत झाले आहेत पावसाळ्या पूर्वी सर्व रस्त्याची कामे पूर्ण होतील असे स्पष्ट केले तर जिल्हा वार्षिक आराखड्यातिल 170 कोटी शंभर टक्के खर्च होतील असेही स्पष्ट केले

नाणारला ग्रीनरिफायनरी प्रकल्प होणार नाही – ही काळ्या दगडावरची रेघ

नानारला ग्रीनरिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधाना जे पत्र दिले आहे ते इतर ठिकाणी लोकांची गरज आहे तिथेच ग्रीनरिफायनरी प्रकल्प व्हावा व तिथे पकल्प करावा यासाठी पत्र दिले आहे ज्या ठिकाणी स्थानिक लोकांचा विरोध नसेल ,आणि प्रकल्पा बाबत जे काही गैरसमज दूर केले जातील त्याठिकाणी ग्रीनरिफायनरी पकल्प करायला कुणाचा विरोध नसेल मात्र नानारला ग्रीनरिफायनरी पकल्प होणार नसल्याचे स्पष्ट केले.

 

First Published on: March 31, 2022 10:29 PM
Exit mobile version