अवघ्या १२ वर्षाच्या मुलाने लावला भन्नाट शोध; समुद्राचे आता प्रदूषण होणार कमी

अवघ्या १२ वर्षाच्या मुलाने लावला भन्नाट शोध; समुद्राचे आता प्रदूषण होणार कमी

अवघ्या १२ वर्षाच्या मुलाने लावला भन्नाट शोध; समुद्राचे आता प्रदूषण होणार कमी

पुण्याच्या अवघ्या १२ वर्षाच्या मुलाने समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण कमी होण्यासाठी एक भन्नाट शोध लावला आहे. या मुलाचे नाव हाजिक काजी असे आहे. त्याने एका जहाजाचे मॉडेल तयार केले आहे. या जहाजाचा उपयोग जल प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सागरी जीवन वाचवण्यासाठी होऊ शकतो. दरम्यान त्याने लावलेल्या संशोधनाचे जगभरात कौतुक केले जात आहे. सध्या जल प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. या जल प्रदूषणामुळे समुद्रातील जलजीवनवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे हाजिक काजी या मुलाचे संशोधन फार महत्त्वाचे ठरु शकते.

जहाज, पाणी आणि कचऱ्याचे करणार वर्गीकरण

हाजिक काजीने बनवलेले जहाजाचे नाव इर्विस असे ठेवण्यात आले आहे. हे जहाज समुद्रातील कचरा खेचून घेईल. त्यानंतर त्यातील पाणी, समुद्र जीवन आणि कचऱ्याचे वर्गीकरण करेल. त्यानंतर पाणी आणि समुद्र जीवन पुन्हा समुद्रात सोडेल. कचऱ्यामध्ये सापडणाऱ्या प्लॅस्टिकचे ५ भागांमध्ये विभागणी केली जाईल, अशी माहीती हाजिकने दिली आहे. हाजिकने आपली संकल्पना टेडएक्स आणि टेड8 या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडली आहे.

काय म्हणाला हाजिक काजी?

हाजिक काझी म्हणाला की, ‘कचऱ्याचा सागरी जीवांवर अतिशय वाईट परिणाम होतो, असे मी काही माहितीपटांमध्ये पाहिले होते. समुद्रातील प्रदूषणाचा जलचरांवर घातक परिणाम होतो. त्यामुळे यासाठी काहीतरी करायला हवे, असा विचार माझ्या मनात आला. आपण जे मासे खातो, ते मासे समुद्रातील मासे खातात. त्यामुळे आपण एकप्रकारे समुद्रातील घाणच खातो’. त्यामुळेच आपण जहाजाचे डिझाईन तयार केले असल्याचे हाजिकने सांगितले आहे.


हेही वाचा – पर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक संशोधने

First Published on: January 23, 2019 3:36 PM
Exit mobile version