Lockdown: चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या मागणीत वाढ; महाराष्ट्रात १३० गुन्हे दाखल

Lockdown: चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या मागणीत वाढ; महाराष्ट्रात १३० गुन्हे दाखल

Lockdown: चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या मागणीत वाढ; महाराष्ट्रात १३० गुन्हे दाखल, ४६ जणांना अटक

कोरोनामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला असला तरी यादरम्यान, महाराष्ट्रात चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या मागणीत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात चाईल्ड पोर्नोग्राफीचा ऑनलाइन शोध आणि त्या संदर्भातील आशयाचा प्रसार यासंबंधी १३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ४६ लोकांना अटक केली आहे. गृह मंत्रालयाच्या मते, इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंडच्या असे लक्षात आले की, गेल्या महिन्यात ‘चाइल्ड पॉर्न’, ‘सेक्सी चाइल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडिओ’ अशा शब्दांसाठी ऑनलाईन शोध सर्वाधिक वाढले आहेत. देशातील बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये अशी प्रकरणे उघडकीस आली असून ती नोंदवली गेली आहेत.

सायबर सेलला ऑपरेशन वेगवान करण्याचे आदेश

जानेवारीपासून महाराष्ट्रातील चाईल्ड पोर्नोग्राफरला अटक करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅकफेस चालविण्यात आले असून ज्याचे परीक्षण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अनिल देशमुख यांनी चाईल्ड पोर्न सर्चला जास्त मागणी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलला अधिकाधिक प्रयत्न करण्यास सांगितले आहे. तसेच, गृहमंत्र्यांनी सायबर सेलला ऑपरेशन वेगवान करण्याचे आदेश दिले आहेत.

चाईल्ड पॉर्नोग्राफी बघणाऱ्यांमध्ये वाढ

मुलांवर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी या पथकाने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच लॉकडाऊनमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफी बघणाऱ्यांमध्ये वाढ होत आहे, यावरून असे लक्षात येते की, समाजात लहान मुलांवर बलात्कार करणारे लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिराकाऱ्यांनी सांगितले.


पालघर हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे
First Published on: April 21, 2020 2:57 PM
Exit mobile version