राज्यात १,९२४ नवे रुग्ण, ३५ जणांचा मृत्यू

राज्यात १,९२४ नवे रुग्ण, ३५ जणांचा मृत्यू

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मुंबईत २४ तासात ६७६ तर राज्यात १ हजार कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात १,९२४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,९२,६८३ झाली आहे. राज्यात ५०,६८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,४७३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ३५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ३, नागपूर ६, वर्धा ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३५ मृत्यूंपैकी २१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२ मृत्यू नागपूर ४, पुणे ४, वर्धा ३ आणि नाशिक १ असे आहेत.

आज ३,८५४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत १८,९०,३२३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,४५,८९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९२,६८३ (१४.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२१,२८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: January 18, 2021 8:17 PM
Exit mobile version