चंद्रपूरमध्ये रुग्णालयातून २ महिन्याचं बाळ चोरीला

चंद्रपूरमध्ये रुग्णालयातून २ महिन्याचं बाळ चोरीला

चंद्रपूरात रुग्णालयातून बाळ चोरीला

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातून बाळ चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकरा घडला आहे. आर्यन साव असं या दोन महिन्याच्या बाळाचे नाव आहे. चंदपूर जिल्ह्यातील हिंगलाज भवानी परिसरात आर्यनचे कुटुंबिय राहतात. आज दुपारी १ वाजता एका अज्ञात महिला आर्यनच्या घरी आली. या महिलेने आर्यनच्या आईला फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन करण्याच्या बाहण्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेली. काही वेळात या महिलेने बाळाला डॉक्टरांना दाखवायचे आहे असे सांगून बाळाला घेऊन फरार झाली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

महिलेचा शोध सुरु

चंद्रपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस या ३५ ते ४० वयोगटातील बाळाला चोरणाऱ्या महिलेचा शोध घेत आहे. निळ्या रंगाची साडी नेसलेल्या या महिलेने तोंडाला पदर बांधला आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व महिलांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

First Published on: December 9, 2018 7:31 PM
Exit mobile version