Omicron Variant : राज्यात २ नव्या ओमिक्रॉन रूग्णांची नोंद, तर आतापर्यंत ११० रूग्ण बाधित

Omicron Variant : राज्यात २ नव्या ओमिक्रॉन रूग्णांची नोंद, तर आतापर्यंत ११० रूग्ण बाधित

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. देशातही ओमिक्रॉनच्या रूग्णांचा आलेख वाढत आहे. परंतु देशासह आता महाराष्ट्रात सुद्धा ओमिक्रॉनची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. राज्यात आज (शनिवार) दोन ओमिक्रॉन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे दोन्ही रूग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ११० रूग्ण बाधित झाले आहेत. ५७ रूग्णांना आतापर्यंत डिस्जार्ज देण्यात आलाय. तर ५३ रूग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

ओमिक्रॉनसोबतच राज्यात १ हजार ४८५ इतक्या नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७९६ इतके रूग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. कोरोनामुळे आज १२ रूग्णांचा मृ्त्यू झाला आहे. तर ९ हजार १०२ इतके रूग्णांवर उपचार सुरू आहे.

कोणत्या शहरांत आढळले ओमिक्रॉनचे रूग्ण?

मुंबई ४६, पिंपरी-चिंचवड १९, पुणे ग्रामीण १५, पुणे महापालिका ७,सातारा ५, उस्मानाबाद ५, कल्याण-डोंबिवली २, औरंगाबाद २, नागपूर २, लातूर १, वसई-विरार १, नवी मुंबई, १, ठाणे महापालिका १, मिरा-भाईंदर १, अहमदनगर १, बुलडाणा १ अशा एकूण मिळून ११० रूग्ण बाधित आढळले आहेत.

मुंबईत सलग सहाव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद

मुंबईत आज सलग सहाव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्युची नोंद झालेली होती. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंत सहाव्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. या महिन्यात यापूर्वी ११ डिसेंबर, १५ डिसेंबर,१८ डिसेंबर, २०डिसेंबर आणि २२ डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.


हेही वाचा : ठाणे हादरले! अपहरण झालेल्या बाळाचा मृतदेह ड्रममध्ये आढळल्याने खळबळ


 

First Published on: December 25, 2021 8:07 PM
Exit mobile version