घरठाणेठाणे हादरले! अपहरण झालेल्या बाळाचा मृतदेह ड्रममध्ये आढळल्याने खळबळ

ठाणे हादरले! अपहरण झालेल्या बाळाचा मृतदेह ड्रममध्ये आढळल्याने खळबळ

Subscribe

आदल्या दिवशी अपहरण झालेल्या पाच महिन्याच्या श्रीकांत शंकर चव्हाण हा तान्हुला त्याच्या राहत्या घराच्या काही अंतरावरील एका घराबाहेरील प्लाटिक ड्रममध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ठाण्यातील कळवा येथील सायबानगर येथे समोर आली आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केला आहे.

मृत तान्हुला हा शनिवारी दुपारी घरात झोपी गेला होता. याचदरम्यान कोणीतरी त्याला पळवून नेले होते. मुलगा दिसत नसल्याने त्याच्या आई शांतीबाई (३०) यांनी त्याचा शोध घेतला पण मिळून येत नसल्याने त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्या तान्हुल्याचे अपहरण होऊन चोवीस तास होत नाही तोच शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास श्रीकांत हा तान्हुला तो राहत असलेल्या घरापासून बाजूच्या गल्लीत एका घराबाहेरील पाण्याच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये मृतावस्थेत मिळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

ज्या परिसरात ही घटना घडली आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तसेच आजूबाजूच्या परिसरात कुठे सीसीटीव्ही आहेत का? ते पाहून त्यामध्ये कोणी त्या तान्हुल्याला घेऊन जाताना दिसून येते का याचा शोध सुरू आहे. तसेच कळवा पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


हेही वाचा : IND vs SA : ‘हे माझं नाही निवड समितीचं काम’, कर्णधारबाबत राहुल द्रविडने दिली प्रतिक्रिया

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -