बीड : रॅपिड Antigen चाचणीत आढळले २१० बाधित

बीड : रॅपिड Antigen चाचणीत आढळले २१० बाधित

बीड : रॅपिड Antigen चाचणीत आढळले २१० बाधित

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये दुकानदार, व्यापारी, उद्योजक, कामगार यांचे एकाचवेळी २५ बुथवर रॅपिड Antigen टेस्ट मोहिम राबविण्यात आली. या पाच शहरामधील ५ हजार ३१० व्यापाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २१० जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.

तीन दिवस राबवण्यात आली मोहिम

बीड जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दुकानदार, व्यापारी, उद्योजक, कामगार यांचे एकाचवेळी रॅपिड Antigen टेस्ट मोहिम राबवण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. अंबाजोगाई, माजलगाव, केज, परळी आणि आष्टी या शहरांमध्ये २५ बुथवर तीन दिवस ही मोहिम राबवली जाणार असून आज पहिल्या दिवशी तब्बल ५ हजार ३१० जणांची रॅपिड Antigen टेस्टमध्ये २१० जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परळीत १ हजार ८३ जणांची केली रॅपिड Antigen टेस्ट

परळीत तब्बल १ हजार ८३ जणांची रॅपिड Antigen टेस्ट करण्यात आली आहे. त्यात ५७ जणांचा कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. आष्टीमधील ६२९ दुकानदार आणि व्यापाऱ्यांची टेस्ट केली त्यात १७ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर केजमध्ये ५२९ दुकानदार आणि व्यापाऱ्यांची तपासणी झाली असून त्यामध्ये १८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.


हेही वाचा – Corona: औरंगाबादमध्ये बाधितांची संख्या १९ हजार पार


 

First Published on: August 18, 2020 11:25 PM
Exit mobile version