सनम बेवफा, लिव्ह – इन पार्टनरची हत्या

सनम बेवफा, लिव्ह – इन पार्टनरची हत्या

लिव्ह – इन पार्टनरच्या झालेल्या हत्येनं ठाण्यात खळबळ उडाली आहे. ठाण्यामध्ये २३ वर्षिय लिव्ह – इन पार्टनरची डोक्यात सिलिंडर घालून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, तरूणी आपल्याला फसवत असल्याचा संशय तरूणाला आला. त्यानंतर त्यानं तरूणीच्या डोक्यात सिलिंडर घालून हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर पोलिसांनी तरूणाला अटक देखील केली आहे. ठाण्यातील गोलवली गावात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरूणीला रूग्णालयामध्ये दाखल केलं. पण, त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही. अखेर उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला. यासंदर्भातील अधिक चौकशी पोलिस करत आहेत.

यापूर्वी देखील ठाण्यात एकतर्फी प्रेमातून, प्रेमाला नकार दिल्यानं तरूणींवर हल्ले झाल्याचे, त्यांचा खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता लिव्ह इन पार्टनरच्या हत्येनं ठाणे पुन्हा एकदा हादरून गेलं आहे. या घटनांनी सुसंस्कृत ठाण्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. शिवाय, या साऱ्या घटनांबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.

First Published on: December 10, 2018 11:50 AM
Exit mobile version