Omicron Variant: दिलासादायक! राज्यातील २५ ओमिक्रॉन रुग्ण बरे

Omicron Variant: दिलासादायक! राज्यातील २५ ओमिक्रॉन रुग्ण बरे

सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील देखील ओमिक्रॉन रुग्णांची सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पण आज राज्यात ओमिक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे. तसेच २५ ओमिक्रॉनबाधित रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे.

काल, बुधवारी राज्यात ४ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आणि एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ३२वर पोहोचली. मात्र आज एकही ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या ३२ ओमिक्रॉनबाधित रुग्णांपैकी २५ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यात ७ ओमिक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत कुठे, किती ओमिक्रॉनबाधित आढळले होते?

मुंबई – १३ रुग्ण
पिंपरी चिंचवड -१० रुग्ण
पुणे मनपा -२ रुग्ण
कल्याण डोंबिवली – १ रुग्ण
नागपूर -१ रुग्ण
लातूर -१ रुग्ण
वसई विरार – १ रुग्ण
उस्मानाबाद – २ रुग्ण
बुलढाणा- १ रुग्ण

कोणत्या राज्यात किती ओमिक्रॉनबाधित रुग्ण? 

राजस्थान- १७

दिल्ली- १०

केरल- ५

गुजरात- ५

कर्नाटक- ३

तेलंगाना- २

आंध्र प्रदेश- १

तमिलनाडू- १

चंडीगढ़- १

पश्चिम बंगाल- १


हेही वाचा – Omicron Variant: पुढील एक महिन्यात ओमिक्रॉन होऊ शकतो धोकादायक!; IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञांचा इशारा


 

First Published on: December 16, 2021 8:04 PM
Exit mobile version