घरताज्या घडामोडीOmicron Variant: पुढील एक महिन्यात ओमिक्रॉन होऊ शकतो धोकादायक!; IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञांचा...

Omicron Variant: पुढील एक महिन्यात ओमिक्रॉन होऊ शकतो धोकादायक!; IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञांचा इशारा

Subscribe

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन पसरला आहे. नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहे. ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये ओमिक्रॉनने आपले भयानक रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) भारतीय वंशाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांनी ओमिक्रॉनबाबत मोठा इशारा दिला आहे. अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ म्हणाल्या की, ‘पुढील एक महिन्यात ओमिक्रॉन जास्त धोकादायक होऊ शकतो.’ पण त्यांनी ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत कमी गंभीर असल्याची शक्यता वर्तवली आहे.

CNBC TV18सोबत बोलताना गीता गोपीनाथ म्हणाल्या की, ‘पुढील एक-दोन महिन्यात ओमिक्रॉन जास्त संक्रामक होऊ शकतो, ज्यामुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढू शकतो. तसेच यामुळे रुग्णालयावर परिणाम होऊ शकतो. जर ओमिक्रॉनचा प्रसार वाढला तर पुन्हा एकदा प्रवासावर बंदी लावली जाऊ शकतो. सध्या लसीकरण खूप गरजेचे आहे.’

- Advertisement -

दरम्यान ओमिक्रॉन बऱ्याच देशांमध्ये गंभीर स्वरुपात पसरला आहे आणि अशा परिस्थितीत आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये ओमिक्रॉनने पाय पसरले आहेत. देशातील एकूण ११ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत देशात ७७ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. आज राजधानी दिल्लीत ४ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे दिल्लीतील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या १०वर पोहोचली आहे. या १० रुग्णांपैकी १ व्यक्ती रिकव्हर झाला आहे. तर ९ जणांवर सध्या एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


हेही वाचा – Omicron Variant: दिलासादायक! राज्यातील २५ ओमिक्रॉनबाधित रुग्ण रिकव्हर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -