Corona: २४ तासांत २६४ पोलिसांना कोरोनाची लागण

Corona: २४ तासांत २६४ पोलिसांना कोरोनाची लागण

वासिंद पोलीस ठाण्यातील निम्म्याहून अधिक पोलीस होम क्वारंटाईन

दिवसेंदिवस कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांमध्ये होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसाठी या संकटात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. मागील २४ तासांत राज्यातील तब्बल २६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार पार

राज्यात २४ तासांत २६४ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ११ हजार ३९२ इतकी झाली आहे. यापैकी ९ हजार १८९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २ हजार ८४ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

२ हजार ८४ पोलिसांवर उपचार सुरु

राज्यात कोरोनाने आतापर्यंत १२१ पोलिसांचा बळी घेतला आहे. तर २ हजार ८४ पोलीस सध्या उपचार घेत आहेत. तर पोलीस दलात संसर्ग झालेल्या पोलिसांमध्ये १ हजार १७९ अधिकारी आणि १० हजार २१३ कर्मचारी यांचा समावेश आगे. तर आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२१ पोलिसांमधील ११ अधिकारी आणि ११० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर पडणे, असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. हे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस प्रशासनाला या कोरोना विषाणूचा अधिक फटका बसत असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – अखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली!


First Published on: August 12, 2020 7:03 PM
Exit mobile version