कर्जमाफीसाठी ३०० कोटींचा निधी

कर्जमाफीसाठी ३०० कोटींचा निधी

राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देत राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीतील शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. या निर्णयासाठी आता ३०० कोटींचा निधी वितरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसारचा निर्णय नुकताच शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे.

जुलै ते ऑगस्ट 2019 या काळात कोकण, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अन्य शेतकर्‍यांप्रमाणे जुलै ते ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली. त्यानंतर यासाठीचा आवश्यक असलेला 300 कोटींचा निधी तत्काळ वितरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. हा निधी वस्त्रोद्योग विभागासाठी राखीव असलेल्या निधीतून तत्काळ या शेतकर्‍यांसाठी वळविण्यात आला. यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडून कार्यक्रम खर्चाच्या योजनेंतर्गत असलेल्या निधीपैकी 300 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी वळविण्यात आल्याने याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. हा निधी वितरीत करण्याची जबाबदारी सहकार आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. याबाबतच्या खर्चाचा अहवाल संबंधित कार्यालयाने वेळोवेळी सरकारला पाठवण्यात येणार आहे.

First Published on: February 17, 2020 2:31 AM
Exit mobile version