राज्यात ३,०७५ नवे रुग्ण, ४० जणांचे मृत्यू

राज्यात ३,०७५ नवे रुग्ण, ४० जणांचे मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

राज्यात ३,०७५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८,५५,३४१ झाली आहे. राज्यात ७५,७६७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४७,७७४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ११, नाशिक ३, सातारा ३, नागपूर ४ आणि अन्य २ यांचा समावेश आहे. आज ७,३४५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत १७,३०,७१५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,१८,७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५५,३४१ (१६.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५५,१८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: December 7, 2020 7:26 PM
Exit mobile version