चिंता वाढली! पिंपरीत ३१ जणांना कोरोनाची लागण

चिंता वाढली! पिंपरीत ३१ जणांना कोरोनाची लागण

passenger come from Dubai to Sindhudurg via Goa is corona positive

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र, अशा परिस्थितीत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील चिंता वाढवणारी आहे. पिंपरी शहरातील २५ आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या ६ अशा एकूण आणखी ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी दुपारी हाती आलेल्या महापालिकेच्या अहवालानुसार शहरातील १५ पुरुष आणि १० स्त्रियांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८४ वर जाऊन पोहोचला आहे.

मृत्यूचा आकडा १५

मिळालेल्या माहितीनुसार; शहराच्या हद्दीबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधिताचा बुधवारी मृत्यू झाला आहे. देहूरोड येथील एका ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहराबाहेरील रुग्णांचा मृत्यूचा आकडा १५ पर्यंत पोहोचला आहे.

या भागात आढळले कोरोनाबाधित रुग्ण

पिंपरी शहरातील आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, दापोडी, रामनगर, चिंचवड, पिंपरी, अजंठानगर, किवळे, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, मोरवाडी या भागातील आहेत. तसेच शहराबाहेरील रुग्ण हे डकी, कसबा पेठ, बालेवाडी आणि औंध येथील रहिवासी आहेत.

कोरोनामुक्तचा आकडा ३०० पार

एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बरे होत असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाणही वाढले आहे. बुधवारी वाकड, चिंचवड, रहाटणी, फुगेवाडी, पिंपळे सौदागर, रावेत, वाल्हेकरवाडी, आनंदनगर, ताथवडे आणि बीड येथील रहिवासी असलेल्या २६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण ३१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


हेही वाचा – टोळ किटक करून शकतात दररोज दोन हजार माणसांचे अन्न फस्त


First Published on: June 4, 2020 11:08 AM
Exit mobile version