घरमहाराष्ट्रटोळ किटक करू शकतात दररोज दोन हजार माणसांचे अन्न फस्त

टोळ किटक करू शकतात दररोज दोन हजार माणसांचे अन्न फस्त

Subscribe

कोरोनासह गेल्या काही दिवसांपासून राज्याला आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे टोळधाडीचा. टोळधाड अतिशय विनाशकारी असून अख्ख शेत फस्त करण्याची त्यांची क्षमता आहे. टोळ हे पिकासाठी किती नुकसानकारक आहे, याचा अंदाज यावरून काढता येतो की एखादी टोळ एक चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचली तर दररोज हजार ते दोन हजार लोकांना पुरणारे अन्न फस्त करू शकते. टोळ ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणी देखील प्रजनन होते. त्यांना वाळवंटातील जमीन प्रजननासाठी अधिक योग्य मानली जाते.

हेही वाचा – Nisarg Cyclone – चर्चा खूप झाली, पण वादळ मुंबईत आलं का नाही? वाचा!

- Advertisement -

हे टोळ जगातील सर्वात विनाशकारी स्थलांतरीत किटकांपैकी एक आहे. अनुकूल परिस्थितीत एका टोळ समुहात सुमारे ८ कोटी टोळ असतात. जो हवेनुसार १५० किमी पर्यंत प्रवास करू शकतो. टोळ त्याच्या मार्गाने येणारी सर्व प्रकारची पिके आणि नॉन पिके फस्त करून टाकतो. पिकांचे नुकसान केवळ प्रौढ टोळ नाही तर अर्भक टोळ देखील पिके फस्त करतात. या टोळीचा हल्ला भारतावर यापूर्वीही झाला आहे. एक टोळ दिवसातून २ ग्रॅम खातो परंतु त्याची संख्या इतकी जास्त असल्यामुळे ते शकडो एकर शेतातलं अन्न फस्त करू शकते. हा वाळवंटातील कीटक आहे. महाराष्ट्रातील काही भागात याचा दुष्परिणाम जमविण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -