पीएम केअर फंडातून ३१०० कोटींचे वाटप

पीएम केअर फंडातून ३१०० कोटींचे वाटप

करोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडातून ३१०० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी १००० कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लस निर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.

करोनाशी लढा देण्यासाठी पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. यामधील २००० कोटी रुपये व्हेटिलेटरची खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे. तर १००० कोटी रुपये स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणार आहे. तर उर्वरित १०० कोटी रुपये लसनिर्मिती करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाविरोधात लढण्यासाठी पीएम-केअर फंडची निर्मिती केली होती. यावेळी त्यांनी लोकांना पीएम केअर फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी ट्विट करत सांगितले होते की, देशभरातील लोकांनी करोनविरोधीत लढाईत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही भावना लक्षात घेता पीएम केअर फंडची निर्मिती केली आहे. निरोगी भारताची निर्माण करण्यात हे महत्त्वाची भूमिका बजावेल.

First Published on: May 14, 2020 6:54 AM
Exit mobile version